“नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींच्या मदतीने इम्रान खान यांचा फोन हॅक केला”, पाकिस्तानच्या मंत्र्याचा आरोप

| Updated on: Jul 21, 2021 | 6:17 PM

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी (Former Pakistan PM Nawaz Sharif) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Narendra Modi) मदतीने इम्रान खान (Imran Khan) यांचा फोन हॅक केल्याचा सनसनाटी आरोप झालाय.

नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींच्या मदतीने इम्रान खान यांचा फोन हॅक केला, पाकिस्तानच्या मंत्र्याचा आरोप
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी (Former Pakistan PM Nawaz Sharif) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Narendra Modi) मदतीने इम्रान खान (Imran Khan) यांचा फोन हॅक केल्याचा सनसनाटी आरोप पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री फारुख हबीब (Farrukh Habib) यांनी केलाय. ‘आपल्या राजकीय विरोधकांचा’ खासगी डेटा गुप्तपणे मिळवण्यात शरीफ यांची भूमिका असल्याचा संशय हबीब यांनी व्यक्त केला. तसेच यासाठी इस्रायली पेगेसस स्पायवेअरचा (Israeli Pegasus Spyware) उपयोग झाला, असाही आरोप फारुख हबीब यांनी केला. ते फैसलाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

फारुख हबीब म्हणाले, “2018 च्या निवडणुकी आधी इम्रान खान विरोधी पक्षाचे प्रमुख नेता होते. त्यांनी त्यावेळी ‘पनामा पेपर्स’ प्रकरण आणि निवडणुकीत घोटाळा केल्या प्रकरणी नवाज शरीफ यांच्या विरोधात आक्रमक अभियान राबवलं होतं. त्यामुळेच पीएमएल-एन नेते इम्रान खान यांची हेरगिरी करण्यासाठी इस्राईलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्याच्या मदतीने खासगीपणाचा भंग करत शरीफ यांनी भारतासोबतच्या आपल्या संबंधांचा उपयोग केला.

“मोदींच्या मदतीने हॅकिंग”

पाकिस्तानचे मंत्री हबीब म्हणाले, “नवाज शरीफ यांनी पाकिस्तान आणि ‘काश्मीरी लोकांच्या’ शत्रुकडून मदत घेत विरोधकांचे फोन टॅप केले. मोदी आपल्या विरोधकांच्या खासगीपणावर हल्ला करत होते तेव्हा शरीफ यांनी देखील त्यांच्या मदतीने इम्रान खान यांच्या फोनवरील माहिती चोरली. या प्रकरणी आम्ही नवाज शरीफ यांच्याकडून उत्तर मागू. त्यांनी याआधी देखील न्यायाधीश, राजकीय नेते, गुप्तचर संस्थांचे प्रमुख आणि राजकीय विरोधक यांच्याबाबत असं केलेलं आहे.”

इम्रान खान यांचा फोनही हँगिंकच्या यादीत

इस्राईली स्पायवेअर ‘पेगेसस’च्या मदतीने जगभरातील अनेक लोकांचे फोन टॅप करण्यात आल्याचं अनेक माध्यमसंस्थांनी म्हटलंय. याबाबतचा संशोधन अहवाल रविवारी प्रकाशित झाल्यावर जगभर चर्चेला उधाण आलं. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील पत्रकार, सरकारी अधिकारी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे स्मार्टफोन हॅक करण्यासाठी इस्रायली कंपनीच्या स्पायवेअरचा उपयोग करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. याच रिपोर्टनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही एक फोन हॅक करण्यात आला होता.

हेही वाचा :

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, काँग्रेसचा मोठा आरोप

पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर, केंद्राच्या संमतीशिवाय हल्ला होऊच शकत नाही, सामनातून मोदी-शहांवर वार

Pegasus : पेगासस म्हणजे नेमके काय? हे काय आणि कसे कार्य करते?

व्हिडीओ पाहा :

Allegations of Nawaz Sharif take help of Narendra Modi to hack Imran Khan Phone