
टॅरिफवरुन चीन आणि अमेरिका यांच्यात वाद सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या दोन्ही देशातील टॅरिफवरुन सुरु असलेला वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेने जिनिव्हामध्ये चीन व्यापार कराराची घोषणा केली. तर याचवेळी काही महत्त्वाचे संकेत देखील मिळाले आहेत, चला तर मग जाणून घेऊया.
बीजिंगने अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अधिकृत वृत्तसंस्थेने ठाम भूमिका घेत म्हटले आहे की, “मूलभूत तत्त्वांशी तडजोड करण्यासाठी आमच्यावर दबाव आणणारा किंवा जागतिक समतेच्या व्यापक उद्दिष्टाला धक्का पोहोचवणारा कोणताही प्रस्ताव चीन ठामपणे फेटाळेल.”
अमेरिकेने चीनसोबत व्यापार करार केला आहे. जिनिव्हा येथे दोन दिवस चाललेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर हा करार करण्यात आला. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी स्वित्झर्लंडच्या कोलोन उपनगरातील एका व्हिलामध्ये रविवारी ही घोषणा केली. वाढती व्यापार तूट आणि व्यापारयुद्ध कमी करण्याच्या उद्देशाने ही चर्चा करण्यात आली.
अमेरिका आणि चीन यांच्यातील महत्त्वाच्या व्यापारी चर्चेत आम्ही बरीच प्रगती केली आहे, ज्याचा तपशील आम्ही सोमवारी सामायिक करू, परंतु मी तुम्हाला सांगू शकतो की ही चर्चा अतिशय सकारात्मक होती,” असे बेझंट यांनी स्वित्झर्लंड सरकारचे आभार मानले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या ट्रुथ सोशलवर लिहिले की, “ब्रेकिंग: अमेरिकेने जिनिव्हामध्ये चीन व्यापार कराराची घोषणा केली” आणि व्हाईट हाऊसला टॅग केले. बीजिंगने अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु त्यांच्या अधिकृत वृत्तसंस्थेने ठाम भूमिका घेत म्हटले आहे की, “मूलभूत तत्त्वांशी तडजोड करण्यासाठी आमच्यावर दबाव आणणारा किंवा जागतिक समतेच्या व्यापक उद्दिष्टाला धक्का पोहोचवणारा कोणताही प्रस्ताव चीन ठामपणे फेटाळेल.”
मात्र, या वाटाघाटीतून कोणताही मोठा निकाल लागण्याची शक्यता कमी असली तरी दोन्ही देश मोठ्या प्रमाणात शुल्क कपात करू शकतात, असे मानले जात आहे. तसे झाल्यास जगभरातील वित्तीय बाजारपेठा आणि अमेरिका-चीन व्यापारावर अवलंबून असलेल्या कंपन्यांना दिलासा मिळेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवर जास्त कर लावण्याच्या निर्णयानंतर चीननेही प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर एप्रिलमध्ये चीनने अमेरिकेवर शुल्काची घोषणा केली होती. आता अमेरिकेने चीनवर 145 टक्के तर चीनने अमेरिकेवर 125 टक्के टॅरिफ लादले आहे.