
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का देत तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर काही आरोपही केली. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर चीन मैदानात उतरलाय. त्यांनी अमेरिकेवर थेट टीका देखील केली. चीनच्या अर्थमंत्रालयाच्या प्रवक्तांनी अमेरिकेने लावलेल्या टॅरिफबद्दल बोलताना म्हटले की, मुळात म्हणजे चीनला लढायचे नाहीये. मात्र, चीन युद्धाला घाबरत देखील नाही. आवश्यक असेल तर चीन मोठी कारवाई देखील करेल. चीनकडून एकप्रकारे हा अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला. अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफमुळे भविष्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे दाट संकेत आहेत.
अमेरिकेविरोधात चीनने घेतली थेट मोठी भूमिका
अमेरिका प्रत्येक वेळी उच्च टॅरिफ लावण्याची भाषा चीनसोबत करतंय. चीनसोबतच्या वाटाघाटीमध्ये ही योग्य भाषा आणि मार्ग नसलयाचे चीनने स्पष्ट म्हटले. अमेरिकेला मोठे आवाहन करत चीनने म्हटले की, आम्ही अमेरिकेला त्यांच्या चुकीच्या पद्धती ताबडतोब दुरुस्त करण्याचे आणि स्थिर, निरोगी आणि विकासात्मक चीन-अमेरिका आर्थिक आणि व्यापारी संबंध राखण्याचे आवाहन करतो.
अमेरिकेला जाणाऱ्या जहाजांवर विशेष बंदर शुल्क आकारू
यादरम्यान चीनने म्हटले की, आम्ही अमेरिकेला जाणाऱ्या जहाजांवर विशेष बंदर शुल्क आकारू. अमेरिकेने आमच्यावर लादलेल्या टॅरिनंतर आम्हाला संरक्षणात्मक कारवाई म्हणून हे पाऊल उचलावे लागतंय. जर अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर चीन आपल्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा थेट इशारा मंत्रालयाने अमेरिकेला दिला आहे.
1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर 100 टक्के टॅरिफ
थोडक्यात काय तर आता चीन देखील अमेरिकेवर मोठा टॅरिफ लावण्याचा थेट विचार करताना दिसतोय. हेच नाही तर अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांवर देखील ते कर आकारण्याच्या तयारीत आहेत. चीनने स्पष्टपणे अमेरिकेला धमकी दिली आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर 100 टक्के टॅरिफ अमेरिका लावणार आहे. यामुळे दोन्ही देशातील व्यापार संबंध तणावात येण्याची दाट शक्यता आहे.