अरे देवा, लय मोठी गडबड केली, ट्रम्प तर इराणच्या मागे हात धुवूनच लागले, एका शब्दाने रण पेटले

Donald Trump criticized Mojtaba Khamenei Mohammad Bagher: डोनाल्ड ट्रम्प हे जगाला त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू इच्छित आहेत. कधी भारताला डिवच, तर कधी रशियाचा चिमटा काढा. इराण सारख्या देशांवर हल्ला कर. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला बंदी कर. हा जणू त्यांचासाठी खेळ झाला आहे. आता त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

अरे देवा, लय मोठी गडबड केली, ट्रम्प तर इराणच्या मागे हात धुवूनच लागले, एका शब्दाने रण पेटले
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणच्या नेतृत्वाला चिमटा
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 24, 2026 | 10:01 AM

US President Donald Trump: इराणसोबत चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अचंबित करणारे वक्तव्य केले आहे. ट्रम्प हे जगाला त्यांच्या मर्जीनुसार वागू इच्छित आहेत. भारतासह चीनला ते नर्क म्हणतायेत. तर रशियाला चिमटा काढत आहेत. आता त्यांनी अजून एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी इराणवर हल्ला केला खरा, पण तिथली नेते आता त्यांच्यात कुत्रा-मांजरासारखी भांडत असल्याची टीका त्यांनी केला. इराणचा सर्वेसर्वा कोण यावरून या नेत्यांमध्येच भांडणं लागल्याचा दावा त्यांनी केला. इराणमध्ये आम्ही खरंच मोठी गडबड केली असा सूर आळवत त्यांनी शीर्ष नेत्यांना चिमटा काढला.

या देशाचा नेता कोण?

आम्ही तर इराणसोबत करार करू इच्छित आहेत. आम्ही त्यांच्याशी संवादही साधला आहे. पण या देशाचा नेता तरी कोण आहे, असा चिमटा त्यांनी काढला. आता आम्ही हल्ला करून मोठी गडबड तर केली नाही ना ? आता आम्ही त्यांच्यातील हा वाद थोडा कमी करण्यासाठी त्यांना संधी देत आहोत, असे फटकारे त्यांनी इराणच्या नेतृत्वाला लगावले. इराणच्या नेतृत्वात खरंच वाद आहे का की ट्रम्प हे एक कार्ड खेळू पाहत आहेत हे इराणच्या प्रतिक्रियेनंतर लागलीच लक्षात येईल.

होर्मुज खुला करण्याविषयी ट्रम्प यांचे मत काय?

Donald Trump यांनी होर्मुज स्ट्रेटविषयी मोठे वक्तव्य केले आहे. इराणचे नेते आमच्याकडे आले. त्यांनी होर्मुज स्ट्रेट खुला करण्यासाठी सहमती दाखवली. हे ऐकताच माझे सहकारी एकदम खूष झाले, पण मी मात्र आनंदित झालो नाही असा टोला त्यांनी लगावला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, मी त्यांना म्हणालो की एक मिनिट थांबा. जर स्ट्रेट उघडले तर त्याचा अर्थ आहे. प्रत्येक दिवशी 500 दशलक्ष डॉलरची कमाई, हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रत्येक दिवशी 500 दशलक्ष डॉलर कमवावे असे मला वाटत नाही. त्यामुळे मीच म्हणालो की हे थांबवा. या सागरी समुद्रधुनीवर आमचे पूर्ण नियंत्रण आहे. जोपर्यंत ते करार करत नाही आणि ऐकत नाहीत, तोपर्यंत हा मार्ग उघडणार नाही.

ट्रम्प यांची इराणला मोठी धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. जर याविषयीचा करार झाला नाही तर तेहराणचे नामोनिशाण उरणार नाही. हे युद्ध संपावे याची मला कोणतीही घाई नाही. हा करार माझ्या मतानुसार व्हायला हवा असा दमही त्यांनी दिला.

तर दुसरीकडे इराणने ट्रम्प यांच्या दादागिरीला सडेतोड उत्तर दिले आहे. ट्रम्प हे भ्रमात आहेत. इराण कोणताही दुसरा निर्णय घेणार न हा केवळ त्यांचा अंदाज आहे, असा टोला इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ईस्माईल बाकई यांनी गुरुवारी SNN या वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला. त्यांनी इराणच्या नेतृत्वात कोणतेही मतभेद असल्याचा दावाही खोडला.

Follow Us