
रशिया-युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरु असलेलं युद्ध मी सत्तेवर आल्यानंतर लगेच थांबवीन, असं आश्वासन ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिलं होतं. सत्तेवर येऊन त्यांना आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटलाय. पण अजून त्यांना रशिया-युक्रेन युद्ध थांबवता आलेलं नाहीय. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने रशियाला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी दोन हात करायची तयारी ठेवली. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगात दोन महासत्ता तयार झाल्या. सोवियत युनियन आणि अमेरिका. या सोवियत युनियनमधील बलाढ्य देश होता रशिया. जगात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची सोवियत युनियनमध्ये धमक होती. त्यामुळे जगाची दोन गटात विभागणी झाली. एक सोवियत समर्थक देश आणि दुसरे अमेरिका समर्थक. या स्पर्धा, संघर्षातूनच शीत युद्धाला सुरुवात झाली. 60,70,80 च्या दशकात शीत युद्ध टिपेला पोहोचलं होतं. सोवियत युनियन आणि अमेरिकेत कधी युद्धाची ठिणगी पडले अशी स्थिती होती. पुढे 1991 साली सोवियत युनियनच विघटन झालं. सोवियत...