America Firing : अमेरिकेत बेधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी

अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California) राज्यातील राजधानीचं शहर सॅक्रोमेंटोमध्ये रविवारी गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

America Firing : अमेरिकेत बेधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू, 9  जखमी
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 6:49 PM

न्यूयॉर्क : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California) राज्यातील राजधानीचं शहर सॅक्रोमेंटोमध्ये रविवारी गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे.   सॅक्रामॅटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. सॅक्रामॅटो पोलिसांच्या प्रवक्ते सार्जेंट यांनी दिलेल्या माहितीनुसार शुटिंग 10 वी आणि जे स्ट्रीटस भागात गोळीबार झाला आहे. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार गोळीबारामुळं लोक सैरावैरा धावत असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला आलेल्या माहितीनुसार 13 लोकांनी गोळ्या लागल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी या घटनेची अद्याप अतिरीक्त माहिती दिलेली नाही. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी शुक्रवारी देखील टेक्सासमध्ये गोळीबार झाला होता.

गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

कॅलिफोर्नियातील सॅक्रामॅटो शहरात झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ट्विट

शुक्रवारी टेक्सासमध्ये गोळीबार

शुक्रवारी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ह्यूस्टनमध्ये गोळीबार झाला होता. त्या घटनेत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी अधिकारी ड्युटीवर हजर नव्हता. टेक्सासमधील 51 वर्षीय शेरिफ डॅरेन अल्मेंडारेज यांना गुरुवारी एका दुकानाबाहेर गोळी मारण्यात आली होती. त्यामध्ये ते जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींची माहिती मिळाली आहे. जोशुआ स्टीवर्ट आणि फ्रडोरियस क्लार्क यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्टीवर्ट क्लार्क यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे.तर, स्टीवर्ट यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिसऱ्या अल्पवयीन आरोपीचा शोध सुरु आहे.

इतर बातम्या :

Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे अनेक डबे घसरले, रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी

National kusti championship : कविटगावच्या पैलवानाचं ‘यश’; कुस्ती स्पर्धेत केली रौप्य पदकाची कमाई