
बातमी अमेरिकेमधून आहे... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झालीय. जो बायडन घरी होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळ संशयास्पद विमान घिरट्या घालत होतं.

बायडन राहात असलेल्या विलमिंगटनमधील घराच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी नो फ्लाईंग झोन आहे. असं असतानाही एक संशयास्पद विमान तिथं आलं कसं? असा सवाल आता विचारला जातोय.

हे संशयास्पद विमान दिसताच बायडन यांच्या सुरक्षेत असलेल्या फायटर विमानं हवेत झेपावली. त्या विमानाला पुढे एका सुरक्षित विमानतळावर उतरवण्यात आलं.

या विमानामुळे जो बायडन यांच्या सुरक्षेला धोका नसल्याचं समोर आलं आहे. सिक्रेट सर्व्हिस आणि फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात मात्र याचा कोणताही परिणा होणार नाही. त्यांचं शेड्यूल नियोजित कार्यक्रमांनुसारच असेल.