
अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिनेसोटामधील प्री-स्कूलमधून परतणाऱ्या 5 वर्षीय चिमुरड्याला फेडरल एजंटने त्याच्या वडिलांसह ताब्यात घेतले. या दोघांना टेक्सासमधील डिटेंशन केंद्रात घेऊन जाण्यात आले. कोलंबिया हाईट्स पब्लिक स्कूल डिस्ट्रिक्टच्या अधिक्षक जेना स्टेनविक यांनी माहिती दिली की, ताब्यात घेण्यात आलेल्या चार अल्पवयीन मुलांमध्ये लियाम कोनेजो रामोस हा पण एक आहे. या मुलांमध्ये 17 वर्ष, 2 आणि 10 वर्षांचा मुलगा डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. रामोस कुटुंबातील काली मार्क प्रोकोश यांनी माहिती दिली की, मुलं आणि त्याचे वडील हे अमेरिकेत शरणार्थी म्हणून कायदेशीररित्या राहत आहेत.
या गोड चिमुकल्याला ताब्यात घेण्यासाठी सशस्त्र अधिकारी दाखल झाले होते. त्यांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी मुलासह वडिलांना घेराव घातला आणि ताब्यात घेत डिटेंशन केंद्रात नेण्यात आले. याविषयीचा व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगभरातून अमेरिकेच्या या कृतीचा निषेध होत आहे. केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी या मुलाला कैदासारखं पकडून नेताना दिसत आहेत. या मुलाच्या डोक्यावर एक निळी टोपी असून स्पायडर मॅन असलेली शाळेची बॅग पाठीशी धरली आहे. या व्हिडिओनंतर कमला हॅरिस यांनी सुद्धा संताप व्यक्त केला.
अधिकाऱ्यांचा काय दावा?
होमलँड सुरक्षा विभागानुसार, या मुलाचे वडील एड्रियन अलेक्झँडर कोनेजो एरियस याला अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. कारण तो अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या राहत आहे. पण वडील पळून गेल्याने पोलिसांनी मग त्याच्या मुलाला ताब्यात घेतले. मुलाला पोलिसांनी कारवाईचा भाग म्हणून ताब्यात घेतल्याने आता वाद विकोपाला गेला आहे. हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून कायदेशीर शरणार्थी म्हणून अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्यांना देश सोडण्याविषयी कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. सध्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना टेक्सासमधील डिली येथील डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
कमाल हॅरिस यांनी सुनावले
माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी या सर्व ऑपरेशनवर संताप व्यक्त केला. हॅरिस यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. लियाम केवळ एक लहान मुलं आहे. अधिकाऱ्यांनी त्याचा एका ओलिसासारखा वापर केला. हा प्रकार निंदाजनक असल्याचे हॅरिस यांनी म्हटले आहे. तर लियामच्या शाळा प्रशासनाने पण या घटनेवर नाराजी व्यक्त केली. कोलंबिया हाईट्स स्कूलच्या सुपरिटेंडंट जेना स्टँविक यांनी एका पाच वर्षांच्या निरागस मुलाला अशा प्रकारे ताब्यात घेण्यात आले, तो गुन्हेगार होता का? असा सवाल स्टँविक यांनी केला.