Pakistan Air Strike : इराण विरुद्ध युद्ध सुरु असतानाच पाकिस्तानचं धक्कादायक पाऊल, थेट AIR STRIKE

Pakistan Air Strike : सध्या जगात रशिया विरुद्ध युक्रेन, इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका असं युद्ध सुरु आहे. या दरम्यान पाकिस्तानने एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी सुद्धा नव्या युद्धाला सुरुवात केली आहे. त्यांनी एअर स्ट्राइक केला आहे.

Pakistan Air Strike : इराण विरुद्ध युद्ध सुरु असतानाच पाकिस्तानचं धक्कादायक पाऊल, थेट AIR STRIKE
Pakistan Air Strike
| Updated on: Mar 13, 2026 | 8:31 AM

सध्या जगात दोन युद्ध सुरु आहेत. रशिया विरुद्ध युक्रेन आणि इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका. आता जगात तिसऱ्या युद्धाला सुरुवात होऊ शकते. पाकिस्तानने एका धक्कादायक पाऊल उचललं आहे. रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. रमजानच्या पवित्र महिन्याचे अखेरचे दिवस सुरु असताना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आमच्या संप्रभुतेचं उल्लंघन केलं आहे असा दावा अफगाणिस्तानने केला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिकासह देशाच्या अन्य भागात भीषण हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानने हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या रहिवाशी वस्त्यांना लक्ष्य केलय. अनेक नागरिकांची घर उद्धवस्त झाली आहेत, असं अफगाणिस्तानमधील तालिबानी अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाकिस्तानच्या हल्ल्यात निष्पाप महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी फायटर जेट्सनी वाळवंटी प्रदेश तसचं निर्जन क्षेत्रातही बॉम्बफेक केली आहे.

तालिबान सरकारने पाकिस्तानच्या या सैन्य कारवाईला क्रूर आक्रमकता ठरवलं आहे. रमजानच्या शेवटच्या दहा दिवसात आणि ईदचा सण जवळ येत असताना अशा प्रकारचा हल्ला करणं, यातून पाकिस्तान शासन मानवी सिद्धांत आणि नैतिक मुल्यांना मानत नाही हे दिसून येतं. अफगाणिस्तानने याला क्रूर गुन्हा ठरवलं आहे. आक्रमकतेचा कठोर शब्दात निषेध केला आहे. अफगाणिस्तानने सुद्धा या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. या क्रूरतेला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही असं तालिबानने म्हटलं आहे.

यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राइक करण्याची ही पहिली वेळ नाहीय. दोन्ही देशांमध्ये मागच्या काही दिवसांपासून आर-पारचं युद्ध सुरु आहे. अलीकडेच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या विभिन्न शहरात हवाई हल्ले केले होते. अफगाण तालिबान सरकारच्या सैन्य तळांना लक्ष्य करणारे हे हल्ले आहेत, असं पाकिस्तानच्या सूचना मंत्र्यांनी सांगितलं होतं. पाकिस्तानी एअर स्ट्राइकला उत्तर म्हणून तालिबानने सीमेवरील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केलं. यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले. अफगाणिस्तानने सुद्धा पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला.

Follow Us