US-Iran Talks : संपूर्ण शरणागती किंवा विनाश, इराणला धडकी भरवणारं अमेरिकेचं खतरनाक पाऊल

US-Iran Talks : इराण आणि अमेरिकेत जिनेव्हा येथे चर्चा सुरु आहे. या दरम्यान अमेरिकेने एक मोठं पाऊल उचललं आहे. इराण निश्चित यामुळे टेन्शनमध्ये येईल. मिडिल ईस्टमधील तणाव कमी करण्यासाठी आखाती देशांचे प्रयत्न सुरु आहेत. पण अमेरिकेचा हा निर्णय चिंतेत अजून भर घालणारा आहे.

US-Iran Talks : संपूर्ण शरणागती किंवा विनाश, इराणला धडकी भरवणारं अमेरिकेचं खतरनाक पाऊल
USS Abraham Lincoln fighter jets
| Updated on: Feb 18, 2026 | 8:34 AM

मागच्या काही दिवसांपासून अमेरिका मिडिल ईस्टमध्ये सतत आपली लष्करी ताकद वाढवत आहे. मागच्या 24 तासात अमेरिकेने 50 पेक्षा जास्त फायटर जेट या भागात तैनात केले आहेत. इराणसोबत त्यांच्या अणवस्त्र कार्यक्रमावर डिप्लोमॅटिक चर्चा सुरु असताना अमेरिकेने हे पाऊल उचललय. हवाई आणि नौदल शक्ती मजबूत करणारं हे पाऊल असल्याचं अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितलं. एक्सियोसने एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने या बिल्डअपचा रिपोर्ट दिला आहे. यात एअरक्राफ्टची तैनाती कन्फर्म करण्यात आलीय. F-22, F-35 आणि F-16 हे फायटर जेट्स मिडिल ईस्टच्या दिशेने जात असल्याचं रेकॉर्ड करण्यात आलं असून एरियल रिफ्यूलिंग टँकरही दिसले आहेत अशी माहिती इंडिपेंडेंट फ्लाइट-ट्रॅकिंग डेटा आणि मिलिट्री एविएशन मॉनिटर्सने दिली. एअरक्राफ्ट ऑपरेशन्सची तयारी करत असल्याचे हे संकेत आहेत.

अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये जिनेव्हा येथे दुसऱ्या राऊंडची चर्चा सुरु असताना US ने हे पाऊल उचललय. काहीही झालं तरी इराणला अणवस्त्र संपन्न राष्ट्र बनण्यापासून रोखणं हा अमेरिकेचा अजेंडा आहे. त्याशिवाय इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल कार्यक्रमालाही आवर घालण्याचं उद्दिष्टय आहे. कारण त्यामुळे इस्रायलला धोका आहे. जून मध्ये दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं. त्यावेळी इराणी मिसाइल्स इस्रायलपर्यंत सहज पोहोचू शकतात हे स्पष्ट झालं. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चर्चेला गंभीर, कंस्ट्रक्टिव आणि सकारात्मक म्हटलं. ‘मागच्या बैठकीच्या तुलनेत चांगली प्रगती आहे. आमच्याकडे पुढचा रस्ता स्पष्ट आहे’ असं अब्बास अराघची इराणी सरकारी टेलीविजन म्हणाले. मध्य पूर्वेत अमेरिकी सैन्याच्या वाढत्या उपस्थितीमुळे युद्ध अटळ दिसू लागलय.

USS गेराल्ड R फोर्ड सोबत कुठल्या युद्ध नौका 

USS गेराल्ड R फोर्ड एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राइक ग्रुप कॅरेबियन समुद्रातून इराणच्या दिशेने निघाला आहे. आता तो मिड-अटलांटिकमध्ये आहे. USS गेराल्ड R फोर्ड सोबत तीन गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर, USS महान, USS बॅनब्रिज आणि USS विंस्टन चर्चिल या युद्धानौका सुद्धा सोबत आहेत. एका अमेरिकन नौदल अधिकाऱ्याच्या हवाल्याने असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिलं. USS अब्राहम लिंकन आणि अमेरिकेच्या दुसऱ्या महत्वाच्या एअर आणि नेवल एसेट्स या वर्षाच्या सुरुवातीलाच या भागात तैनात करण्यात आल्या होत्या.

कमीत कमी रस्ता दिसू लागलाय

दोन्ही बाजू सावधतापूर्वक पुढे जात असून डीलची अपेक्षा आहे. जिनेवा चर्चेमध्ये प्रगती झाल्याचं अमेरिकी अधिकाऱ्याने मान्य केलं. अजून बऱ्याच डिटेल्सवर चर्चा बाकी आहे. एका अमेरिकी अधिकाऱ्यानुसार, पुढच्या दोन आठवड्यात अजून सविस्तर प्रस्तावासह येऊ असं इराणी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचे दूत जेरेड कुशनर आणि स्टीव विटकॉफ यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सांगितलय. “आमची चर्चा मार्गदर्शक तत्वांपर्यंत पोहोचली आहे. याचा अर्थ असा नाही की, आमच्यात लगेच कुठला करार होईल. पण कमीत कमी रस्ता दिसू लागलाय” असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले.