Russia-Ukraine war : व्लादिमिर पुतिन यांचा मोठा निर्णय, ‘या’ देशात तैनात करणार अणवस्त्र

| Updated on: Mar 26, 2023 | 3:26 PM

Russia-Ukraine war : अणवस्त्र वाहून नेऊ शकणारी 10 फायटर विमान रशियाने आधीच या देशात पाठवली आहेत. युद्ध जिंकण्यासाठी ते सर्व ताकत पणाला लावतील. असाच एक मोठा निर्णय पुतिन यांनी घेतला आहे.

Russia-Ukraine war : व्लादिमिर पुतिन यांचा मोठा निर्णय, या देशात तैनात करणार अणवस्त्र
russian president Vladimir Putin
Follow us on

Russia-Ukraine war : सध्या ऱशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार लढाई सुरु आहे. रशियाला युक्रेनचा एक-एक प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. युक्रेनला या युद्धात अमेरिका आणि अन्य नाटो देशांकडून पाठबळ मिळतय. त्या बळावर युक्रेन रशिया विरुद्ध लढतोय. युद्ध सुरु होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. रशिया काही दिवसात, काही आठवड्यात हे युद्ध जिंकणार हा विश्लेषकांचा अंदाज चुकीचा ठरलाय. युक्रेन आजही बलाढ्य रशियाची दोन हात करतोय.

युक्रेन अजूनही युद्धा लढतोय, त्यामागच कारण आहे अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांकडून मिळणारी मदत. व्लादिमिर पुतिन आता काहीही झालं, तरी मागे हटणार नाहीत. युद्ध जिंकण्यासाठी ते सर्व ताकत पणाला लावतील. असाच एक मोठा निर्णय पुतिन यांनी घेतला आहे.

1990 नंतर प्रथमच असा निर्णय

रशियाने त्यांची अणवस्त्र शेजारच्या बेलारुसमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी ही घोषणा केली. 1990 नंतर प्रथमच रशिया देशाबाहेर अणवस्त्र तैनात करणार आहे.

पुतिन टोकाचा निर्णय घेऊ शकतात

युक्रेन युद्धावरुन अमेरिका आणि युरोपियन देशांबरोबरचा तणाव वाढत असताना पुतिन यांनी हा निर्णय घेतलाय. काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, रशियन राष्ट्राध्यक्ष टोकाचा निर्णय घेऊ शकतात. याआधी सुद्धा रशियाने अणवस्त्र युद्धाची धमकी दिली आहे. बेलारुसची सीमा नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडला लागते. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांच्यात खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

बेलारुसची रशियाला साथ

युक्रेन युद्धात बहुतांश युरोपियन देश रशियाच्या विरोधात असताना बेलारुस मात्र रशियाला साथ देतोय. अलेक्झांडर लुकाशेनको व्लादिमिर पुतिन यांचे विश्वासू आहेत.

पुतिन काय म्हणाले?

“यात असाधारण असं काही नाहीय. अमेरिका अनेक दशक मित्र देशांच्या भूमीवर अणवस्त्राची तैनाती करायची. आता आम्ही तेच करतोय. अणवस्त्रासंबंधी कुठल्याही आंतरराष्ट्रीय बंधनांच उल्लंघन करणार नाही” असं पुतिन म्हणाले.

टॅक्टिकल न्यूक्लियर वेपन्स म्हणजे काय?

बेलारुसमध्ये ही अणवस्त्र केव्हा तैनात केली जाणार? त्या बद्दल पुतिन यांनी काही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. युद्धभूमीत ठराविक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टॅक्टिकल न्यूक्लियर वेपन्सचा उपयोग केला जातो.

अणवस्त्र वाहून नेऊ शकणारी 10 फायटर विमान रशियाने आधीच बेलारुसमध्ये तैनात करुन ठेवली आहेत. इस्कांदर मिसाइल्सही बेलारुसला आधीच पाठवली आहेत. अणवस्त्र हल्ल्यासाठी ही मिसाइल्स वापरतात.