
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढत चालला आहे. या वाढत्या संघर्षपूर्ण स्थितीचा इराणला मोठा फायदा होत आहे. पाकिस्तान सोबतच्या या संघर्षामुळे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आणि व्यापारावर मोठा परिणाम झालाय. पाकिस्तानसोबत सीमावाद, औषध पुरवठ्यावर बंदी आणि ट्रांजिट पॉलिसीमुळे अफगाणिस्तान आता इराण आणि सेंट्रल आशियाकडे झुकतोय. परिणामी पाकिस्तानचा दशकापासूनचा आर्थिक दबदबा कमी होत आहे. इराणचा प्रभाव वेगाने वाढतोय. मागच्या सहा महिन्यात अफगाणिस्तान आणि इराणमध्ये व्यापार $1.6 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलाय. पाकिस्तानसोबत होणाऱ्या $1.1 अब्ज डॉलर्सपेक्षा हा जास्तीचा व्यापार आहे. अफगाणिस्तान चाबहार बंदर आणि इराणी ट्रांजिट रुट्सचा वापर करुन पाकिस्तानवरील अवलिंबात्वावरुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानचे उद्योग व व्यापार मंत्रालयाचे प्रवक्ते अखुंदजादा म्हणाले की, पाकिस्तानने जरी सीमा बंद केल्या तरी चाबहार मार्गाने आमचा व्यापार थांबणार नाही.
पाकिस्तान आर्थिक आणि मानवी विषय राजकीय शस्त्राप्रमाणे वापरतोय असा आरोप तालिबानचे उप पंतप्रधान मुल्ला बरादर यांनी केला. त्यांनी अफगाणी व्यापाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत पाकिस्तानसोबत सर्व कॉन्ट्रॅक्ट संपवण्याचं अल्टीमेटम दिलं आहे. याचा सर्वाधिक परिणाम औषधांच्या व्यापारावर होत आहे. कारण पाकिस्तानातून येणारी औषधं स्वस्त, सहज उपलब्ध होणारी आणि लवकर पोहोचतात.
पाकिस्तानचा दावा काय?
तालिबान आता भारत, टर्की, इराण आणि मध्य आशियातून औषधं मागवण्याचा विचार करत आहे. पण मोठी समस्या आहे ती म्हणजे परदेशी कंपन्यांची वेगवान रजिस्ट्रेशन प्रक्रिया, मंजूर औषधांची लिस्ट वाढवणं आणि औषधांची 300 कंटेनर तालिबानने कंधार कस्टममध्ये रोखून धरले आहेत. त्यामुळे किंमती वाढतायत. इराणचं मेल्क आणि जाहेदान पॉइंट आता अफगाणिस्तानचे व्यापार केंद्र बनले आहेत. अफगाणिस्तानच्या निर्णयाने आम्हाला काही फरक पडणार नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. अफगाणिस्तानची इराण आणि सेंट्रल आशियातील देशांसोबत जवळीक वाढतेय. अफगाणिस्तान सध्या पाकिस्तानला हटवून स्थायी पर्याय शोधत आहे.