मोठी बातमी! भारताच्या वेशीवर सर्वात मोठा हल्ला, पानबुडीने जहाज उडवलं, भयानक विध्वंसाने खळबळ!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणच्या नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. आता हे युद्ध थेट भारतीय सीमेजवळपर्यंत पोहोचले आहे.

मोठी बातमी! भारताच्या वेशीवर सर्वात मोठा हल्ला, पानबुडीने जहाज उडवलं, भयानक विध्वंसाने खळबळ!
Iran War
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 04, 2026 | 4:27 PM

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता पाचव्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. या संघर्षाची आग हिंद महासागरापर्यंत पोहोचली आहे. इस्त्रायल इराणच्या अनेक भांगांना लक्ष करत आहेत. तसेच इराण देखील अमेरिका आणि इस्त्रायलला चांगलेच उत्तर देत आहे. आता हे युद्ध भारताच्या सीमेजवळ येऊन ठेपले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…

श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ (गल्ले परिसरात) एका इराणी जहाजावर (संभाव्यतः फ्रिगेट IRIS Dena) पाणबुडी हल्ल्याची घटना घडली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, श्रीलंकन नौदल आणि संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्यात कमीतकमी १०१ जण बेपत्ता आहेत, तर ७८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जहाज बुडले असून, श्रीलंकन नौदलाने बचावकार्य सुरू केले आहे. काही रिपोर्ट्समध्ये ३०-३२ जणांना वाचवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तेहरानवर इस्रायलचे सातत्याने हल्ले

दुसरीकडे, इराणची राजधानी तेहरान इस्रायलच्या हवाई हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य बनली आहे. इस्रायलने “broad wave of strikes” सुरू केल्या असून, मिसाइल साइट्स, एअर डिफेन्स सिस्टम्स आणि कमांड सेंटर्सना लक्ष्य केले जात आहे. शहरात स्फोटांचे आवाज, धूर आणि आगीचे लोट दिसत आहेत. अमेरिकन आणि इस्रायली फोर्सेसने इराणच्या एअर डिफेन्सला मोठ्या प्रमाणात कमकुवत केले असून, तेहरानवर हवाई वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत.

भारतासाठी वाढती चिंता

हे युद्ध श्रीलंकेच्या समुद्री सीमेपर्यंत पोहोचल्याने भारताची सुरक्षा आणि व्यापार चिंता वाढली आहे. हिंदी महासागरातील सागरी मार्गांवर हल्ले होत असल्याने, भारताच्या कच्च्या तेल आयाती आणि जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकन CENTCOM ने सांगितले की, इराणच्या नौदलाला मोठा फटका बसला असून, १७ जहाजे (एक सबमरीनसह) नष्ट करण्यात आली आहेत. इराणने प्रतिहल्ले सुरू ठेवले असून, होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे.

जागतिक परिणाम

या संघर्षाने जागतिक ऊर्जा बाजार हादरला आहे; तेल आणि गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीने थरारले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणच्या नागरिकांना उठाव करण्याचे आवाहन केले असले तरी, युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. श्रीलंकन नौदल सध्या शोध आणि बचाव कार्यात व्यस्त आहे

Follow Us