US Tariff On India : Apple ने डोनाल्ड ट्रम्पना दिला मोठा झटका, भारताच्या बाबतीत घेतला चांगला निर्णय

US Tariff On India : Apple ने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला मोठा झटका, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर राग काढतायत. पण प्रत्यक्षात अमेरिकेत त्यांचं कोणी ऐकत नसल्याच दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनांना अमेरिकन कंपन्या काडीची किंमत देत नाहीयत. Apple च्या एका निर्णयावरुन हे दिसून आलय. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सांगितलेलं, नेमकं त्याच्या उलट Apple ने केलय.

| Updated on: Aug 18, 2025 | 9:35 AM
1 / 10
सध्या डोनाल्ड ट्रम्प भारताच्या विरोधात आहेत. सतत ते भारतविरोधी भूमिका घेत आहेत. भारतावर ते टॅरिफ लावून आर्थिक फटका देण्याचा प्रयत्न करतायत. पण या सगळ्यामुळे ते अमेरिकेत एकटे पडत चालल्याच दिसत आहे.

2 / 10
त्यांनी घेतलेली भारतविरोधी भूमिका अमेरिकेत अनेक एक्सपर्ट्सना पटलेली नाही. त्यावरुन ते वारंवार ट्रम्प यांचे कान टोचत आहेत. दुसरीकडे अमेरिकी कंपन्या सुद्धा ट्रम्प यांचं ऐकायला तयार नाहीत असं दिसतय.

3 / 10
मध्यंतरी ट्रम्प यांनी जगप्रसिद्ध कंपनी Apple ला चीन, भारताऐवजी अमेरिकेत उत्पान प्लान्ट टाकायला सांगितला होता. पण Apple ने ट्रम्प यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याच दिसत आहे.  Apple ने पुन्हा एकदा चीन आणि अमेरिका यांचा दबाव झुगारुन भारतात आपलं iPhone च प्रोडक्शन वाढवलं आहे.

4 / 10
iPhone च उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी फॉक्सकॉनने बंगळुरु जवळच्या नव्या प्लान्टमध्ये iPhone-17 च उत्पादन सुरु केलय. फॉक्सकॉनचा भारतातील हा दुसरा प्लान्ट आहे. आधी ही कंपनी चेन्नईमध्ये iPhone-17 बनवत होती. पण आता बंगळुरुमध्ये सुद्धा iPhone-17 च उत्पादन सुरु होणार आहे.

5 / 10
CNBC च्या एक रिपोर्टनुसार फॉक्सकॉनने बंगळुरुच्या देवनहल्ली येथे जवळपास 2.8 अब्ज डॉलरची  (25,000 कोटी रुपये) मोठी गुंतवणूक करुन प्लांट सुरु केलाय. सध्या iPhone-17 उत्पादन छोट्या प्रमाणात सुरु केलय.

6 / 10
फॉक्सकॉनचा चीनच्या बाहेर दुसरा मोठा कारखाना आहे. आधी चेन्नईमध्ये एक प्लांट असताना आता बंगळुरुमध्ये नवीन प्लांट सुरु करणं हा Apple चा भारतातील प्रोडक्शन वाढवण्याच्या योजनेचा भाग आहे.

7 / 10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिग्गज टेक कंपनी Apple ला भारतात उत्पादन बंद करायला सांगितलं होतं. पण कंपनीने या उलट भारतात उत्पादन वाढवलं आहे. काही महिन्यापूर्वी कतर दौऱ्यावेळी ट्रम्प या बद्दल Apple चे सीईओ टिम कुक यांच्याशी बोलले होते. ट्रम्प म्हणालेले की, "काल माझी टिम कुक यांच्यासोबत थोडी समस्या झाली. कुक भारतात प्लांट बनवतायत. Apple ने भारतात प्लांट बनवावा अशी माझी इच्छा नाही"

8 / 10
ट्रम्प यांनी दावा केलेला की, या चर्चेनंतर Apple अमेरिकेत आपलं उत्पादन वाढवेल. ट्रम्प असं सुद्धा म्हणालेले की, "आम्हाला भारतात प्लांट सुरु करण्यात अजिबात रस नाही. भारत आपली काळजी घेऊ शकतो" पण प्रत्यक्षात Apple ने ट्रम्प यांच्या धमकीला न जुमानता भारतात आपलं उत्पादन वाढवलं आहे.

9 / 10
या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात iPhone च उत्पादन सहाकोटी युनिटपर्यंत वाढवण्याची Apple ने आधीच घोषणा केली आहे. मागच्यावर्षी कंपनीने 3.5 ते 4 कोटी Iphone इथे बनवलेले. आता तीच संख्या वाढवून 6 कोटी करण्याची योजना आहे.

10 / 10
Apple चे सीईओ टिम कुक अलीकडेच म्हणालेले की, 'अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश iphone भारतातून आयात केले जातील' भारताला प्रोडक्शन हब बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाच पाऊल आहे.