विमानाने उड्डाण करताच शेवटच्या सीटवर बेधुंद कपलने सोडल्या सर्व मर्यादा, एअर होस्टेस म्हणाली ते पाहून मला…, नेमकं काय घडलं?
एअर होस्टेसची नोकरी बाहेरून खूप ग्लॅमरस वाटते, अनेकांना एअर होस्टेसच्या नोकरीच मोठं आकर्षण वाटतं. मात्र या नोकरीची दुसरी बाजू देखील असते. ती अनेकांना माहिती नसते, असाच एक प्रसंग एका माजी एअर होस्टेसने सांगितला आहे.

एअर होस्टेसची नोकरी बाहेरून खूप ग्लॅमरस वाटते, अनेकांना एअर होस्टेसच्या नोकरीच मोठं आकर्षण वाटतं. एअर होस्टेला विमानांमधून वेगवेगळ्या देशात फिरायला मिळतं, वेगवेगळ्या देशातील लोकांसोबत बोलणं होतं, नव्या लोकांची ओळख होते. परंतु जशी ही नोकरी एकदम भारी वाटते, तसेच या नोकरीची दुसरी देखील एक बाजू आहे. ज्याबद्दल फारच थोड्या प्रवाशांना माहीत असतं. याबद्दल एका माजी एअर होस्टेसनी आपला एक अनुभव शेअर केला आहे. या एअर होस्टेसनं वेगवेगळ्या एअरलाईन्ससोबत सहा वर्ष काम केलं आहे.
ती आपला अनुभव शेअर करताना म्हटली की, विमानामध्ये प्रवाशांचं वर्तन कसं असेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. अनेकदा कठीण प्रसंगाचा सामना कारावा लागतो. काही प्रवासी हे विमानात असभ्य वर्तन करतात, त्यामुळे आम्हाला देखील अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा प्रवाशी विमानसेवेच्या नियमांचे उल्लंघन करतात. काही प्रसंगात त्यांच्यावर कारवाई होते, तर काही प्रसंगी त्यांना समज देऊन देखील सोडावं लागतं.
असाच एक किस्सा या माजी एअर होस्टेसने सांगितला आहे. ही एअर होस्टेस एका विमानात त्यावेळी नोकरी करत होती. या विमानाने उड्डाण केलं, त्यावेळी या विमानाच्या शेवटच्या रांगेत बसलेल्या सीटवरील कपल्सने थेट शारीरिक संबंध सुरू केले, असा थक्क करणार अनुभव या एअर होस्टेने सांगितला आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे. या एअर होस्टेसने सांगितलं ती स्थिती आणि त्या प्रवाशांची ती अवस्था पाहून मला तिथे प्रचंड आवघडल्या सारखं झालं. आपल्याला आजू -बाजुचे लोक पहात आहेत, याचे भानही या कपल्सला नव्हतं, असंही या एअर होस्टेसने म्हटलं आहे. पुढे बोलताना या एअर होस्टेसने असं देखील म्हटलं की, या सारखे अनेक प्रसंग आमच्या आयुष्यात येतात, त्याचा सामना आम्हाला करावा लागतो. काही प्रवासी अचानक प्रवासादरम्यान गोंधळ घालतात. त्यावेळी देखील परिस्थिती नियंत्रणात आणावी लागते.
