प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात अंदाधुंदं गोळीबार, क्षणार्धात सगळं सपलं, नुसता रक्ताचा सडा

मोठी बातमी समोर आली आहे, हे सर्व जण फूटबॉलची मॅचे पहाण्यासाठी आले होते, सामना संपल्यानंतर हल्लेखोरांकडून प्रेक्षकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात अंदाधुंदं गोळीबार, क्षणार्धात सगळं सपलं, नुसता रक्ताचा सडा
फूटबॉल मैदानात अंदाधुंद गोळीबार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 26, 2026 | 4:25 PM

मॅक्सिकोतून मोठी बातमी समोर येत आहे, मॅक्सिकोच्या गुआनाजुआतोमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, फूटबॉलचा सामना पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मैदान खचाखच भरलं होतं, त्याचवेळी काही शस्त्रधारी हल्लेखोरांकडून प्रेक्षकांवर अंदाधुंद फायरिंग करण्यात आली, या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सेंट्रल मॅक्सिकोमधील सलामंकामध्ये एका फूटबॉल मैदानात सामना पहाण्यासाठी आलेल्या लोकांवर बंदूकधारी हल्लेखोरांनी अंदाधुंद फायरिंग केली. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, यातील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये काही महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे.

या घटनेवर सलामंकाचे महापौर प्रीटो यांनी दु:ख व्यक्त केलं आहे, ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, जेव्हा फूटबॉलचा सामना संपला तेव्हा हे बंदूकधारी व्यक्ती मैदानात घुसले, नुकतीच मॅच संपल्यामुळे मैदानात मोठी गर्दी होती. याचवेळी त्यांनी तेथील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेमध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक जणाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. तर या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

पुढे बोलताना प्रीटो यांनी असं देखील म्हटलं की दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत, अशा घटना रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना लगाम लावण्यासाठी आम्ही राष्ट्रपती क्लाउडिया शिनबाम यांच्याकडे मदत मागितली आहे. स्थानिक पोलिसांकडून गुन्हेगारांच्या टोळ्या पकडण्याचं काम सुरू आहे, मात्र दुर्दैवाने त्यात अजून तरी म्हणावं असं यश आलेलं नाहीये. दरम्यान ही घटना कशामुळे घडली? फायरिंगचं नेमकं कारण काय होतं? या हल्ल्यामागे कोणाचा हात होता? याचा तपास आता पोलिस करत आहेत.