Ayatollah Khamenei: मोदी सरकारने खोमेनींच्या हत्येचा का केला नाही निषेध? कारण वाचून बसेल धक्का

Ayatollah Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खोमेनी यांच्या हत्येनंतर मध्य-पूर्वेत सध्या मोठा तणाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रायल दौऱ्यावरून परतले आणि इस्त्रायलने हल्ला चढवला. तर आतापर्यंत भारतने खोमेनी यांच्या हत्येचा निषेध का केला नाही याची चर्चा होत आहे.

Ayatollah Khamenei: मोदी सरकारने खोमेनींच्या हत्येचा का केला नाही निषेध? कारण वाचून बसेल धक्का
अयातुल्ला खोमेनी
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 03, 2026 | 3:22 PM

Ayatollah Khamenei Death: सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या हत्येनंतर इराण चवतळला आहे. दोन्ही बाजूने घातक शस्त्रास्त्राचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान भारतातील विरोधक, खासकरून काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर पक्ष खोमेनींच्या हत्येचा मोदी सरकारने साधा निषेधही केला नाही म्हणून टीका करत आहेत. भारत सरकार पारंपारिक परदेशी धोरणापासून फारकत घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पण मोदी सरकारने खोमेनींच्या हत्येचा विरोध का केला नाही, यामागे एक मोठे कारण आहे. काय आहे ते कारण?

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. भारताला या भागात शांती आणि स्थिरता हव आहे. असे संघर्ष, वाद हे केवळ चर्चेतून आणि सहकार्यातून सुटतात असे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांचे हे वक्तव्य दिल्लीचा रोख स्पष्ट करतो. भारत युद्धाच्या नाही तर शांततेच्या बाजूने असल्याचे दिल्लीने स्पष्ट केले.

भारताने खोमेनींच्या हत्येचा निषेध का केला नाही?

भाराताच्या या मौनामागे एक मोठे कारण आहे. एक मोठा इतिहास आहे. खोमेनी यांनी भारताच्या अंतर्गत विषयात नाहक लुडबूड केली होती. विशेषता जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तान हे खोमेनींचे आवडतेच नाही तर जिव्हाळ्याचे विषय होते. त्यावरील त्यांचे वक्तव्य हे भारताला खटकणारी होती. 2017 ते 2024 या काळात खोमेनी यांनी भारतविरोधी वक्तव्य केली होती.

खोमेनींचा भारतविरोधी वक्तव्याचा ट्रॅक रेकॉर्ड

2017 (काश्मीर मुद्दा): खोमेनी हे पाकिस्तानची भाषा बोलत होते. काश्मीरचा राग आळवत होते. काश्मिरी मुस्लिमांनी एकजूट होण्याचे आवाहन करत होते.

2019 (अनुच्छेद 370): जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यांनी भारताकडे न्यायपूर्ण धोरण राबवण्याचे आवाहन केले होते.

2020 (दिल्ली दंगल): खोमेनी यांनी हिंदू पीडितांविषयी कोणतीच संवेदना व्यक्त केली नाही. पण #IndianMuslimsInDanger अशी मोहिम त्यांनी राबवली. याशिवाय नागरिकता सुधारणा कायदा (CAA) हा मुस्लिम विरोधी असल्याचे ते म्हटले होते.

सप्टेंबर 2024: खोमेनी यांनी भारताची तुलना गाझा पट्टी आण म्यानमारशी करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पण दोन्ही देशातील संबंध कधीच जास्त ताणल्या गेले नाही.

भारताची चिंता वाढली

दरम्यान रविवारी भारतातील इराणी दुतावासाने अमेरिका आणि इस्त्रायलचा निषेध करण्याचा आग्रह मोदी सरकारके केला आहे. खोमेनी यांच्या हत्येचा निषेध करण्याची विनंती दुतावासाने केली आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराण अधिकाऱ्यांनी समुद्री मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे.

Follow Us