AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगा पुन्हा चर्चेत, ट्रम्पसंदर्भातील भविष्यवाणी 100 टक्के ठरली सत्य… मग आता 2025 मध्ये जगात विनाश सुरु होणार का?

Baba Vanga Prediction: मानवतेच्या विनाशाची सुरुवात सन 2025 मध्ये एका आपत्तीजनक घटनेने होईल, असे बाबा वेंगा यांनी म्हटले आहे. 2025 मध्येच युरोपमध्ये एक भयंकर संघर्ष सुरू होईल, ज्यामुळे मोठा विध्वंस होईल. त्यामुळे त्या ठिकाणीवरील लोकसंख्येवर या घटनेचा वाईट परिणाम होईल.

बाबा वेंगा पुन्हा चर्चेत, ट्रम्पसंदर्भातील भविष्यवाणी 100 टक्के ठरली सत्य... मग आता 2025 मध्ये जगात विनाश सुरु होणार का?
Baba Vanga and donald trump
| Updated on: Jul 15, 2024 | 9:25 AM
Share

Baba Vanga 2025 Prediction: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत रविवारी हल्ला झाला. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागल्यामुळे ते बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ट्रम्प यांच्यावरील हल्लानंतर बाबा वेंगा चर्चेत आले. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी शंभर टक्के सत्य ठरली आहे. त्यामुळे सर्व जगाला धक्का बसला आहे. कोण आहे बाबा वेंगा ज्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यांनी ट्रम्प आणि जगासंदर्भात काय भविष्य वर्तवले होते.

ट्रम्प हल्ला अन् बाबा वेंगाची भविष्यवाणी

ट्रम्प यांच्यावर रविवारी हल्ला झाल्यानंतर बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची चर्चा सुरु झाली आहे. बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. त्यांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्रध्यक्षाचे जीवन धोक्यात असल्याचे भविष्य वर्तवले होते. त्यांनी 2025 पासून मानवतेचा विनाश सुरु होणार असल्याचे भविष्य वर्तवले आहे. यामुळे आता जग विनाशाच्या उंबरठ्यावर आली आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसऱ्या महायुद्धासंदर्भात त्यांनी वर्तवलेले भविष्य खरे ठरले होते.

कोण आहेत बाबा बेंगा

बाबा वेंगा बुल्गारियामधील अंध फकीर आहे. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला. 12 वर्षी त्यांना अंधत्व आले. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. परंतु त्यापूर्वी त्यांनी शेकडो वर्षांची भविष्यवाणी केली. त्यांची भविष्यवाणी जिज्ञासा आणि चिंतेचा विषय ठरली आहे. त्यांनी व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. तसेच ट्रम्प यांना रहस्यमय आजार होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांमध्ये 2025 मधील भविष्यवाणीसंदर्भात अनेक दावे केले जात आहे. त्यानुसार, 2025 पासून जगाच्या विनाशाला सुरुवात होणार आहे. 9/11 हल्ला, कुर्स्क पनडुब्बी दुर्घटना यासंदर्भात बाबा बेंगा यांचे भविष्य खरे ठरले आहे.

मानवाचा एलियनशी संपर्क होणार

मानवतेच्या विनाशाची सुरुवात सन 2025 मध्ये एका आपत्तीजनक घटनेने होईल, असे बाबा वेंगा यांनी म्हटले आहे. 2025 मध्येच युरोपमध्ये एक भयंकर संघर्ष सुरू होईल, ज्यामुळे मोठा विध्वंस होईल. त्यामुळे त्या ठिकाणीवरील लोकसंख्येवर या घटनेचा वाईट परिणाम होईल. बाबा वेंगा यांनी म्हटले आहे की, 2028 पर्यंत मानव शुक्रापासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करतील. यानंतर 2033 मध्ये हवामानात मोठे बदल होणार आहेत. ध्रुवीय बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2130 मध्ये मानवाचा एलियनशी संपर्क होणार असल्याचे बाबा वेंगा यांनी म्हटले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.