AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विमान कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू; एका क्षणात आनंदी वातावरण शोकाकुल

small Plane crash : बहामासमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या विमान अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! विमान कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू; एका क्षणात आनंदी वातावरण शोकाकुल
| Updated on: Jul 11, 2026 | 7:42 AM
Share

कॅरिबियन बेटांवर असलेला बहामास देशातून धक्कादायक बातमी हाती आली आहे. बहामासमध्ये शुक्रवारी विमान कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देशात एकीकडे 53 वा सातंत्र्यदिन साजरा होत असतानाच ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर सरकारने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. बहामास सरकारने ‘फ्लेमिंगो एअर’ची सर्व विमाने उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहे. विमान अपघात हा बहामासची राजधानी नासाऊजवळील उत्तर अँड्रोसजवळ झाल्याची माहिती हाती आली आहे.

स्वातंत्र्यदिन साजरा करताना विमान अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. बहामासचे पंतप्रधान फिलिप ब्रेव्ह डेव्हिस यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्सची तपासणी करण्यात येत आहे.

देशातील आनंदी वातावरण शोकाकुल

पंतप्रधान फिलिप ब्रेव्ह डेव्हिस यांनी दु:ख व्यक्त करताना म्हटलं की, ‘आज सर्व एकत्र दु:खद प्रसंगाला सामोरे जात आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात मग्न होता. त्याच दिवशी अपघात होऊन आनंदी वातावरण शोकाकुल झालं आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्ती पुन्हा कधी येऊ शकणार नाही. प्रत्येक कुटुंबाप्रती आमच्या मनपूर्वक संवेदना आहेत’.

विमानतळावरून उड्डाण घेताच भयंकर घडलं

बहामास विमान अपघात तपास प्राधिकरणाने या घटनेशी निगडीत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘अपघातग्रस्त विमान हे नोंदणीकृत असून ते Cessna 402 प्रकाराचे विमान होते. या विमानाने नासाऊच्या लिंडन पिंडलिंग इंटरनॅशनल विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर काही क्षणात अँड्रोसजवळ दुर्घटना घडली. या अपघातानंतर बहामासचे ऊर्जा आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कठोर कारवाई केली हे. त्यांनी ‘फ्लेमिंगो एअर’चे एअर ऑपरेटर सर्टिफिकेट निलंबित केलं आहे. विमान वाहतूक मंत्री जोबेथ कोल्बी-डेव्हिस यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, ‘शुक्रवारी एकाच दिवशी फ्लेमिंगो एअरलाइन्समध्ये सुरक्षेच्या दोन मोठ्या चुका घडल्या आहेत. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट रद्द केलं आहे’.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ