सर्वात मोठी बातमी! अखेर पाकिस्तानचे दोन तुकडे झालेच… 85 टक्के जमिनीवर नव्या देशाचे राज्य

Pakistan Split : बलुचिस्तानने पाकिस्तानला मोठा धक्का देत स्वतःला स्वतंत्र देश घोषित केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. बलुचिस्तानच्या सैन्याने प्रदेशातील सुमारे 85 टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले असल्याचेही या पत्रात समोर आले आहे.

सर्वात मोठी बातमी! अखेर पाकिस्तानचे दोन तुकडे झालेच... 85 टक्के जमिनीवर नव्या देशाचे राज्य
pakistan split News
Image Credit source: Google
बापू गायकवाड | Updated on: Jul 14, 2026 | 4:33 PM

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. बलुचिस्तानने पाकिस्तानला मोठा धक्का देत स्वतःला स्वतंत्र देश घोषित केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पत्रामध्ये ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ या नावाने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आल्याचा उल्लेख आहे. व्हायरल पत्रानुसार, बलुचिस्तानच्या सैन्याने प्रदेशातील सुमारे 85 टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले असून, स्वतंत्र देशाचा ध्वज, राष्ट्रगीत, नवे चलन आणि प्रशासकीय व्यवस्था लागू करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

खनिजसंपत्ती आणि वायू क्षेत्रांवर नियंत्रणाचा दावा

व्हायरल पत्रामध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. यात असे नमूद करण्यात आले आहे की, नव्या सरकारने खनिजसंपत्ती, नैसर्गिक वायू क्षेत्रे आणि कोळसा खाणींवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. तसेच पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांतील अनेक अधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन बलुचिस्तानला पाठिंबा दिल्याचाही दावा या पत्रात करण्यात आला आहे.

Loading...

पाकिस्तानविरोधात यापूर्वीही आंदोलने

बलुचिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानविरोधात अनेकवेळा आंदोलने झाली असून, स्थानिक नागरिकांनी आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली आहे. अशा परिस्थितीत बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र घोषित केल्याच्या दाव्यामुळे पाकिस्तानची चिंता आणखी वाढली आहे.

या दाव्याला अधिकृत दुजोरा नाही

सोशल मीडियावरील व्हायरल पत्रातील दाव्यांची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच कोणत्याही प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था किंवा मान्यताप्राप्त देशाने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे याला अधिकृतपणे देश म्हणता येणार नाही.

बलुचिस्तानमध्ये हिंसाचारात वाढ

गेल्या काही महिन्यांत बलुचिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येथे बलुच फुटीरतावादी गट आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) * या दहशतवादी संघटनांकडून पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर हल्ले केले जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, 5 जुलैपासून आतापर्यंत 109 दहशतवादी ठार करण्यात आले असून, त्यापैकी 71 जण ‘ऑपरेशन शाबान’ दरम्यान मारले गेले आहेत. हे अभियान पाकिस्तान लष्कर, फ्रंटियर कॉर्प्स (FC) आणि बलुचिस्तान पोलिसांनी संयुक्तपणे राबवले होते. मात्र सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे या प्रदेशातील परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनल्याचे दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us