तो 75 वर्षांचा खासदार, 19 वर्षाच्या दुसऱ्या बायकोने उचललं टोकाचं पाऊल; बांगलादेशातील प्रकरणाची जगभरात चर्चा!
जुलैमध्ये गाझी नजरुल यांचा एका तरुणीसोबतचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी ती तरुणी आपली दुसरी पत्नी मरियम असल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर जमात-ए-इस्लामीने 22 जुलै रोजी त्यांना पक्षातून निष्कासित केले होते.

सध्या एका 75 वर्षीय खासदाराची चर्चा होत आहे. हा खासदार बांगलादेशातील असून त्याला पोलिसांनी अटक केलंय. त्याच्या 19 वर्षीय दुसऱ्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवलंय. याच कारणामुळे हा खासदार, त्याच्या दुसऱ्या पत्नीवर तसेच पत्नीच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तिघांनाही बेड्या ठोकण्यात आल्यात. या खासदाराची पत्नी एनएएम भवनात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. अटक करण्यात आलेल्या खासदाराचे नाव गाझी नजरुल इस्लाम असे आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशातील सतखीरा-4 मतदारसंघाचे खासदार गाझी नजरुल इस्लाम यांच्या 19 वर्षीय दुसऱ्या पत्नी मरियम खातून यांच्या मृत्यूप्रकरणी खासदारांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. मरियम यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी राजधानी ढाका येथील एनएएम भवनातील फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी मरियम यांच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांना केलं आरोप
या प्रकरणात खासदार गाजी नजरुल इस्लाम, त्यांची पहिली पत्नी मकसुदा बेगम आणि मेहुणा ओबैदुल रहमान यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरवाजा आतून बंद होता, मरियम यांचा मृतदेह…
पोलिसांच्या माहितीनुसार, मरियम यांचा मृतदेह एनएएम भवनाच्या पाचव्या क्रमांकाच्या इमारतीतील खासदारांच्या फ्लॅटमध्ये आढळला. त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. पोलिस आणि घटनास्थळी उपस्थित लोकांनी दरवाजा तोडल्यानंतर मरियम यांचा मृतदेह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या स्थितीत आढळला.
मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता?
मरियम यांच्या कुटुंबीयांनी तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, जून महिन्यात मरियम यांचा 75 वर्षीय गाझी नजरुल इस्लाम यांच्याशी इस्लामी पद्धतीने विवाह झाला होता. लग्नानंतर त्या खासदारांसोबत एनएएम भवनात राहत होत्या. मात्र, पहिल्या पत्नीच्या उपस्थितीत त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मरियम यांनी फोनवरून कुटुंबीयांना याबाबत माहिती दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पलंगावर चिठ्ठी सापडली
रविवारी संध्याकाळी खासदारांनी मरियम यांच्या वडिलांना फोन करून तातडीने एनएएम भवनात बोलावले होते. घटनास्थळी पोलिसांसह सीआयडी, पीबीआय आणि डिटेक्टिव्ह ब्रँचची पथकेही दाखल झाली. पोलिसांना मरियम यांच्या बिछान्यावर कथित सुसाइड नोट सापडली आहे. मात्र, ही चिठ्ठी मरियम यांनीच लिहिली होती का, याची खात्री फॉरेन्सिक तपासणीनंतर होणार आहे.
दरम्यान, जुलैमध्ये गाझी नजरुल यांचा एका तरुणीसोबतचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी ती तरुणी आपली दुसरी पत्नी मरियम असल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर जमात-ए-इस्लामीने 22 जुलै रोजी त्यांना पक्षातून निष्कासित केले होते.
