AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटनची राजकुमारी डायनाची खोटं बोलून मुलाखत घेतल्याचा आरोप, BBC स्वतंत्र चौकशी करणार

बीबीसीने राजकुमारी डायना मुलाखत प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी ब्रिटेनच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती गठीत केली आहे.

ब्रिटनची राजकुमारी डायनाची खोटं बोलून मुलाखत घेतल्याचा आरोप, BBC स्वतंत्र चौकशी करणार
| Updated on: Nov 19, 2020 | 11:43 PM
Share

लंडन : ब्रिटनची राजकुमारी डायनाचा भाऊ अर्ल स्पेंसरने जगप्रसिद्ध वृत्तसंस्था बीबीसीचे पत्रकार मार्टिन बशीर यांच्यावर गंभीर आरोप केले. बशीर यांनी खोटं बोलून डायनाची मुलाखत घेतल्याचा आरोप स्पेंसर यांनी केला. यानंतर आता बीबीसीने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी ब्रिटेनच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती गठीत केली आहे. या निर्णयावर ब्रिटनचे राजकुमार विलियम यांनी स्वागत केलं आहे (BBC order for investigation into princess Dianas 1995 interview).

बीबीसीचे पत्रकार मार्टिन बशीर यांनी 1995 मध्ये राजकुमारी डायनाची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीवर डायनाचे भाऊ अर्ल स्पेंसर यांनी आक्षेप बशीर यांनी डायना यांना मुलाखतीसाठी तयार करण्यासाठी चुकीची कागदपत्रं दाखवल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर बीबीसीने तातडीने स्वंतत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचं राजकुमार विलियम यांनी स्वागत केलं आहे.

केंसिंग्टन पॅलेसने दिलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटलं आहे, “प्रिंस विलियम यांनी या चौकशीच्या आदेशाचं स्वागत केलं आहे. विलियम यांनी ही स्वतंत्र चौकशी योग्य दिशेने टाकलेलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. यामुळे सत्य समोर येण्यास मदत होईल.” राजकुमारी डायना यांचा 1997 मध्ये मृत्यू झाला होता.

बीबीसीने बुधवारी ब्रिटेनचे वरिष्ठ सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सु्प्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती लॉर्ड डायसन यांच्या नेतृत्वात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बीबीसीचे संचालक टिम डेवी म्हणाले, “या घटनेविषयीचं सत्य जाणून घेण्यासाठी बीबीसी कटिबद्ध आहे. यासाठी आम्ही स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. लॉर्ड डायसन एक प्रसिद्ध आणि सम्मानित व्यक्ती आहेत. ते या चौकशीच्या संपूर्ण प्रक्रियेचं नेतृत्व करतील.”

बीबीसीने मुलाखतीसाठी खोटेपणाचा आधार घेतल्याचा आरोप

डायना यांचा भाऊ अर्ल स्पेंसर यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच या मुलाखत प्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, की राजकुमारी डायना यांची मुलाखत घेण्यासाठी सरळसरळ खोटपणाचा आधार घेण्यात आला. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डेवी यांना लिहिलेल्या पत्रात अर्ल स्पेंसर म्हणाले होते, “मार्टिन बशीर यांनी खोटं बँक स्टेटमेंटचा उपयोग केला. आपण राजघराण्यात काम करणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या बहिणीच्या सुरक्षेसंबंधित माहिती एकत्र करण्यासाठी पैसे दिल्याचं यातून भासवण्यात आलं होतं. जर हे स्टेटमेंट मला दाखवलं नसतं, तर मी बशीर यांना डायनाची भेटच घालून दिली नसती.”

हेही वाचा :

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

अनेक गौप्यस्फोटांची मालिका, बराक ओबामांच्या पुस्तकाला विक्रमी मागणी, पहिल्या दिवसाचा खप…..

मार्क झुकरबर्गलाही मागे टाकत टेस्लाचे सीईओ मस्क जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत, एकूण संपत्ती किती?

BBC order for investigation into princess Dianas 1995 interview

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.