India Canada Relation : कॅनडात आतापर्यंत जे होतं नव्हतं ते झालं, PM मोदीच्या दौऱ्याआधी कॅनडाच मोठं सकारात्मक पाऊल

India Canada Relation : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरुन मोदी तिथे चालले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्नी यांना कॅनडा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शिखर सम्मेलनाच्या निमंत्रणासाठी त्यांचे आभार मानले. कॅनडाने आता कारवाईच एक मोठ पाऊल उचललय. जे याआधी कॅनडामध्ये होतं नव्हतं.

India Canada Relation : कॅनडात आतापर्यंत जे होतं नव्हतं ते झालं, PM मोदीच्या दौऱ्याआधी कॅनडाच मोठं सकारात्मक पाऊल
India Canada Relation
| Updated on: Jun 12, 2025 | 1:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याआधी मार्क कार्नी सरकारने खलिस्तान्यांविरोधात ऑपरेशन सुरु केलय. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या खलिस्तान्यांना पकडण्यासाठी कॅनडा सरकारने Project Pelican नावाने ऑपरेशन सुरु केलय. या मोहिमेतंर्गत कॅनडा पोलिसांनी एका मोठ्या ड्रग आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केलाय. कॅनडा पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग जप्तीची कारवाई केली आहे. यात 479 किलोग्रॅम कोकेन आहे. त्याची किंमत 47.9 मिलियन डॉलर आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या सात भारतीय वंशाच्या लोकांसह एकूण नऊ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनुसार हा गट अमेरिका आणि कॅनडामधील कर्मशियल ट्रॅकिंग रुटचा वापर करत होता. यांचा संबंध मॅक्सिकन ड्रग कार्टेल आणि अमेरिकी डिस्ट्रिब्यूटरशी होता. ड्रग व्यापारातून मिळणाऱ्या पैशाचा वापर भारत विरोधी कारवाया उदहारणार्थ विरोध प्रदर्शन, जनमत संग्रह आणि शस्त्रास्त्र खरेदी यासाठी केला जातोय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI या नेटवर्कच समर्थन करत असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय आहे. आयएसआय मॅक्सिकन कोकेन आणि अफगान हेरॉइनच्या तस्करीसाठी कॅनडामधील खलिस्तानी गटांचा वापर करत असल्याचा संशय आहे. साजगिथ योगेन्द्रराजा (31), मनप्रीत सिंह (44), फिलिप टेप (39), अरविंदर पोवार (29), करमजीत सिंह (36), गुरतेज सिंह (36), सरताज सिंह (27), शिव ओंकार सिंह (31) आणि हाओ टॉमी हुइन्ह (27) यांना अटक करण्यात आलीय.

पीएम मोदींनी काय म्हटलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस कॅनडाच्या कनानास्किसमध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत, त्यावेळी ही कारवाई झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरुन मोदी तिथे चालले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्नी यांना कॅनडा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शिखर सम्मेलनाच्या निमंत्रणासाठी त्यांचे आभार मानले. शिखर सम्मेलनात कार्नी यांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याच पीएम मोदींनी म्हटलय.

भारताशी पंगा घेणं ट्रूडोला महाग पडलं

G7 शिवाय पीएम मोदी आणि कार्नी यांची स्वतंत्र बैठक होईल. दोघांच्या बैठकीत खलिस्तानच्या मुद्यावर चर्चा होऊ शकते. भारत खलिस्तान्यांविरोधात कारवाईची मागणी करु शकतो. जस्टिस ट्रूडो यांच्या कार्यकाळात कॅनडात खलिस्तान्यांची हिम्मत वाढली होती. ट्रूडो यांच्या धोरणामुळे भारत आणि कॅनडा यांचे संबंध बिघडले. ट्रूडो यांनी खलिस्तान समर्थक निज्जरसाठी आवाज उठवला होता. भारतावर पुराव्यांशिवाय आरोप केले. भारताशी पंगा घेणं ट्रूडो यांना महाग पडलं. त्यांची सत्ता गेली.