
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांची अलास्कामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे, मात्र त्यापूर्वीच यूक्रेनं रशियाला मोठा धक्का दिला आहे. या बैठकीच्या एक दिवस आधीच युक्रेनच्या नौवदलाकडून असा दावा करण्यात आला आहे की, रशियाचं अत्याधुनिक Su-30SM फायटर जेट काळ्या समुद्राजवळून गायब झालं आहे. या विमानाची किंमत जवळपास 50 मिलियन डॉलर म्हणजेच 415 कोटींच्या घरात आहे. एवढंच नाही तर याचदरम्यान रशियाच्या रियाजन परिसरात असलेल्या एका दारू गोळ्याच्या फॅक्टरीमध्ये जोरदार स्फोट झाला आहे, हा स्फोट देखील युक्रेननेच घडून आणला असल्याचं बोललं जात आहे.
युक्रेनच्या नौवदलानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी स्नेक आइसलँडच्या दक्षिण -पूर्व भागामध्ये मोहिमेदरम्यान रशियाचं Su-30SM फायटर जेट क्रॅश झालं. हे लढाऊ विमान दोन इंजिन, दोन सीट आणि मल्टीरोल फायटर विमान आहे. या विमानाचा उपयोग हा शत्रूंवर अचूक हल्ला करण्यासाठी करण्यात येतो, हा रशियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. युक्रेनच्या गुप्तचर विभागानं केलेल्या दाव्यानुसार क्रॅश झालेल्या या जेटचा संपर्क तुटला होता. त्यानंतर रशियाच्या सैन्याकडून या विमानाचा शोध घेण्यात आला. मात्र अजूनही या विमानाचा आणि त्यामध्ये असलेल्या दोन पायलटचा शोध लागलेला नाहीये.
यापूर्वी देखील घडली होती अशी घटना
दरम्यान Su-30 विमान कोसळल्याची ही पहिलीच घटना नाहीये, तर यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. 2 मे रोजी नोवोरोस्सियस्कमध्ये समुद्री ड्रोनच्या मदतीनं रशियाचं विमान पाडल्याचा दावा युक्रेनं केला होता. त्यानंतर 9 मे रोजी देखील अशीच घटना घडली होती, आता ही तिसरी वेळ आहे. रशियाचं विमान क्रॅश झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे, मात्र यावर अजून रशियानं कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. हा रशियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या विमानाचं वैशिष्ट म्हणजे कितीही दूर अंतरावरून शत्रूचा अचूनक वेध घेऊन त्यांच्यावर हल्ला करता येतो. हे विमान म्हणजे रशियाचं ताकद मानलं जातं.