जगासाठी मोठी गुड न्यूज… अखेर इराण सरेंडर… अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, आता युद्ध संपणार?

Iran Surrender : जगासाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. जगाचा जीव भांड्यात पडला आहे. अमेरिका आणि इराणमधील करार जवळपास पूर्ण होत आहे. त्यामुळे जगातील एक युद्ध थांबण्याची चिन्हं आहेत.

जगासाठी मोठी गुड न्यूज... अखेर इराण सरेंडर... अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, आता युद्ध संपणार?
अमेरिका-इराण युद्ध संपणार
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 24, 2026 | 9:43 AM

US Iran Deal News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला आश्चर्याचा धक्का दिला. इराणसोबत एक व्यापक करार जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या करारानंतर होर्मुज स्ट्रीट समुद्रधुनी उघडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नवीन घडामोडीनुसार इराण त्यांच्याकडील समृद्ध युरेनियमचा साठा देणार आहे. इराणने सपशेल माघार घेतल्याचे संकेत मिळत आहे. इराणने समृद्ध युरेनियमाचा साठा सोपवण्यास तयारी दर्शवल्याने अमेरिका इराण युद्ध थांबण्याची चिन्हं आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून इराणकडील युरेनियम हा दोन्ही देशातील सर्वात मोठा कळीचा मुद्दा होता. माध्यमातील वृत्तानुसार, अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी या कराराविषयी दावा केला आहे की, इराणच्या सहमतीनेच हा करार झाला आहे. आंतरराष्ट्रीय नियम आणि प्रक्रियेनुसार इराण जतन करून ठेवलेले समृद्ध युरेनियम हस्तांतरीत करण्यात येईल. हे युरेनियम एकतर अमेरिकेला देण्यात येईल अथवा रशियाला देण्यात येईल अथवा त्याचे ऊर्जेत रुपांतरण करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

होर्मुज स्ट्रेट उघडणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी महत्त्वाची घोषणा केली. अमेरिका आणि इराण यांच्यात करार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या मते, हा करार केवळ युद्ध थांबवण्यासाठीच नाही तर होर्मुज स्ट्रेट समुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. होर्मुज स्ट्रीट ही गेल्या काही महिन्यांपासून जागतिक तणावाचे केंद्र झाले आहे. ही समुद्रधुनी बंद झाल्याने जगातील इंधन पुरवठ्याला मोठा अडथळा आला होता.

इराणकडे 60 टक्के समृद्ध युरेनियम

आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सीनुसार, इराणकडे जवळपास 970 पाऊंड युरेनियम आहे. त्यातील 60 टक्के हे जतन केलेले आहे. तज्ज्ञांच्या मते, आण्विक शस्त्रासाठी या युरेनियमाचा वापर करण्याची सातत्याने भीती होती. आता काही आठवड्यात दोन्ही देशात आण्विक मुद्दावर नवीन चर्चा सुरू होईल. त्यात इराणकडील युरेनियम भांडाराचे काय करायचे आणि भविष्यात अणू कार्यक्रमाची दिशा निश्चित करण्यात येईल. शेवटच्या करारामद्ये इराणची जगभरात जप्त केलेली आणि गोठवलेली संपत्ती हळूहळू मोकळी करण्यात येईल. इराणला ही संपत्ती परत करण्यात येईल. त्यामुळे या करारतून तेहराणलाही फायदा होईल.

इराणचा दावा काय?

अर्थात याप्रकरणात अद्याप इराणकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खोमेनेई यांनी समृद्ध युरेनियम इराणच्या बाहेर जाणार नाही. त्याचा उपयोग ऊर्जा क्षेत्रासाठी करावा असे यापूर्वीच वक्तव्य केले होते. तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यासह इतर मंत्र्यांनीही असाच सूर आळवला होता. त्यामुळे जोपर्यंत इराणकडून अधिकृत वक्तव्य येत नाही. तोपर्यंत जगाला थोडावेळ चांगल्या वार्तेची वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us