AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol, diesel rates : कच्च्या तेलाचे दर वाढताच मोठा झटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल 335 तर डिझेल तब्बल…

मध्य पूर्वेत मोठा संघर्ष सुरू आहे. मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून, अनेक देशांनी पेट्रोल, डिझेलच्या किमती देखील वाढवल्या आहेत.

Petrol, diesel rates : कच्च्या तेलाचे दर वाढताच मोठा झटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल 335 तर डिझेल तब्बल...
Petrol and diesel ratesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 29, 2026 | 5:54 PM
Share

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे, अमेरिकेकडून इराणवर हल्ले करण्यात येत आहेत. इराणकडून देखील अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. अमेरिका इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम हा आता कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ज्याचा फटका हा थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर होताना दिसत आहे. कच्चं तेल महाग झाल्याने अनेक देशांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य माणसांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दर लिटर मागे तब्बल 50 ते 60 रुपयांनी वाढवले होते, त्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल, डिझेल एवढं प्रचंड महागलं की वाढलेल्या दराची संपूर्ण जगभर चर्चा झाली. दरम्यान आता पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.63 रुपयांनी तर डिझेलचे दर 1.55 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये प्रति लिटर पेट्रोलचा दर हा 335.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर हा 338.38 रुपयांवर पोहोचला आहे.

पाकिस्तानात पेट्रोवर प्रति लिटर मागे तब्बल 110 रुपयांचा टॅक्स आकारला जातो, तर डिझेलवर 96 रुपयांचा टॅक्स आकाराला जातो. दरम्यान पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा तेथील जनतेला दर वाढीचा झटका दिल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. आधीच पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाकिस्तानमध्ये सातत्याने इंधनाचे दर वाढतच असल्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत.  तर भारतात देखील काही दिवसांपूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. मात्र आता स्थिर आहेत.

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...