
Pakistani Embassy Blast: इराणची राजधानी तेहराण येथील पाकिस्तानी दुतावास आणि तिथे तैनात राजदुताच्या घराजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तान इराण आणि अमेरिकेत शांततेसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा हल्ला झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. तर तेहराणवर आज 28 व्या दिवशी सुद्धा हवाई हल्ले तीव्र झाले आहेत. आता हा हल्ला चुकून झाला की इराणमधूनच एखाद्या गटाने हा हल्ला केला याची माहिती समोर आली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकच्या दुतावासा शेजारीच हा हल्ला झाला. पाकिस्तानचा राजदूत या हल्ल्यात बचावला. तर इतर कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. पण या हल्ल्याने कर्मचारी आणि नागरिक दहशतीखाली आले आहेत. हा हल्ला गुरुवारी रात्री जवळपास 8 वाजता पसरदान परिसरात करण्यात आला. याठिकाणीच पाकिस्तानचे दुतावास आणि राजदूताचा बंगला आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे कर्मचारी आणि कुटुंबिय हादरले. त्यांनी लागलीच सुरक्षित ठिकाणी आश्रय शोधला. या हल्ल्यात कोणी जखमी अथवा मृत्यू पडल्याची वार्ता समोर आलेली नाही.
अमेरिकेने केला हल्ला?
अमेरिकेच्या लष्करी वायूदलाचे विमानं तेहराणवर सातत्याने घिरट्या घालत आहेत. तर काही ठिकाणी स्फोट घडवून आणत आहेत. पाकिस्तानच्या Geo या वृत्तवाहिनीनुसार, पाकिस्तानी दुतावासाशेजारीच एक इराणी लष्करी दलाचे ठिकाण आहे. हे स्थळ निशाण्यावर असताना ते चुकलं आणि पाकिस्तानी दुतावासा शेजारी हा हल्ला झाला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जिओ न्यूजला घटनाक्रमाची माहिती दिली. त्यानुसार हा हल्ला अत्यंत मोठा होता. त्यामुळे मोठा आवाज झाला. पण या हल्ल्यात दुतावास अथवा कर्मचारी यांच्या घरांना कोणतेही नुकसान झालेले नाही. पण या घटनेने दुतावासातील कर्मचारी अत्यंत दहशतीखाली आहे. जर हा हल्ला अजून थोडा जवळ झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
या स्फोटानंतर कर्मचारी घाबरलेले आहेत. तरीही ते काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पाकिस्तानी सरकारने याप्रकरणी तेहराणशी संपर्क साधल्याचे समजते. तर याविषयीची चिंताही मित्रा राष्ट्रांना कळवली जाणार आहे. पाकिस्तान इराण आणि अमेरिकेत शांततेसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. इराणने हा प्रस्ताव फेटाळला आहे. तर अमेरिकेने पुढील दीड आठवड्यांसाठी हल्ले थांबवण्याचे जाहीर केले आहे. आता तेहराण काय पाऊल टाकते याकडे जगाचे लक्ष लागले आहे.