जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणे कर्तव्य.. इराणमध्ये थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबले आहे. मात्र, आता थेट इराणी लोकांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची मागणी होत आहे. यावर थेट जाहीर सभांमध्ये बोलले जातंय. ज्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणे कर्तव्य.. इराणमध्ये थेट..
Donald Trump
| Updated on: Jul 05, 2026 | 1:48 PM

इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला अमेरिकेने केला आणि तेव्हापासून युद्धाला सुरूवात झाली. याच पहिल्या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाले. यादरम्यान त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे जीव याच हल्ल्यात गेले. अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. इराणमध्ये वातावरण गरम झाले असून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची मागणी इराणी लोकांकडून केली जातंय. चक्क एका जाहीर मंचावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येबद्दल भाष्य करण्यात आले. न्यूज एजन्सी एसोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पहिल्यांदा असे झाले की, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येबाबत जारी भाष्य करत आवाहन करण्यात आले.

मोठ्या शोकसभेत मोहम्मद रसूली यांनी अमेरिका मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. इस्त्रायल मुर्दाबाद म्हटल्यानंतर त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले. मंचावर खुली धमकी देत म्हटले की, जगातील सर्वात घाण व्यक्ती अजून जिवंत कसा आहे? हे वाक्य कानावर पडताच थेट सभेतील लोकांनी गोंधळ करत याला प्रतिसाद दिला. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

एका व्यक्तीने रडत म्हटले की, आपण त्याला का मारत नाहीत ज्याने आपला इमाम मारला आहे? हे आपले काम आहे.. जर आपण या खूनी व्यक्तीला मारले नाही तर पुढे आपल्या कफनच वाचेल. मी तुमच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो की, मी डोनाल्ड ट्रम्प याला मारून टाकणार आहे. मात्र, व्हिडीओत बोलणारा हा व्यक्ती नक्की कोण हे कळू शकत नाहीये.

त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तेहरानमध्ये काल रस्त्यावर लोक मोठ्या संख्येने उतरले होते. इराणी लोकांना रडताना पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोठा धक्का बसला. इराणी लोक खामेनेई यांच्यावर इतके प्रेम करायचे मला माहिती नव्हते. मला वाटते की, लोक त्यांचा तिरस्कार करत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

Follow Us