7 हजार फुटावर विमान, अचानक धडकला पक्षी, पुढं घडलं असं काही की…हादरवून टाकणारी घटना समोर!

गेल्या काही दिवसांत विमानाचे अनेक मोठे अपघात झालेले आहेत. अहमदाबादमध्ये तर एक प्रवासी वगळता सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे विमानाच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान, नुकताच एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

7 हजार फुटावर विमान, अचानक धडकला पक्षी, पुढं घडलं असं काही की...हादरवून टाकणारी घटना समोर!
plane crash video
| Updated on: Aug 09, 2025 | 7:25 PM

Plane Crash : गेल्या काही दिवसांत विमानाचे अनेक मोठे अपघात झालेले आहेत. अहमदाबादमध्ये तर एक प्रवासी वगळता सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे विमानाच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान, नुकताच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. ही घटना माद्रिद विमानतळाच्या परिसरात घडली असून एका पक्ष्यामुळे विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विशेष म्हणजे हा पक्षी विमानावर धडकल्यामुळे प्रवाशांमध्ये घराबटीचे वातावरण निर्माण झाले होते. विमानातही सगळीगडे धुर पसरला होता. मात्र वैमानिकाने आपले कौशल्य दाखवून विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्यामुळे सर्व प्रवासी बचावले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार 6 ऑगस्ट रोजी इबेरिया एअरलाईन्स या विमान वाहतूक कंपनीची IB579 ही फ्लाईट माद्रिद विमानतळावरून पॅरीसकडे निघाली होती. मात्र टेकऑफ केल्यानंतर पुढच्याच काही मिनिटांनी या विमानाच्या पुढच्या भागावर एक पक्षी आदळला. विशेष म्हणजे हा अपघात काही साधासुधा नव्हता. पक्षी आदळल्याने विमानाचा पुढचा भाग थेट खराब झाला. काही भाग तर विमानापासून वेगळा झालेला पाहायला मिळाला.

पक्षी धडकल्याने विमानाचा पुढचा भाग खराब

विमानावर पक्षी आदळल्यानंतर मध्ये बसलेल्या प्रवाशांत एकच धांदल उडाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पक्षी धडकल्याने विमानाचा पुढचा भाग खराब झाला. तिथे आग लागल्याने विमानात सगळीकडे धूर झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, घडलेला प्रकार समजताच वैमानिकांनी लगेच इमर्जन्सी लँडिंगचा मेसेज पाठवाल आणि तब्बल 7000 फुटांवरून विमान इमर्जन्सी लँड केले.

विमान 7000 फुट उंच गेले अन् अचानक…

IB579 ही फ्लाईट 6 ऑगस्ट रोजी 4.42 वाजता अवकाशात झेपावली. त्यानंतर साधारण 20 मनिटांनी हे विमान 7000 फुट उंच गेले. त्याच वेळी विमानाच्या समोरच्या भागावर (राडोम) तसेच इंजिनवर आदळळा. त्यामुळे विमानाचे चांगलेच नुकसान झाले. क्षणात पायलटच्या केबिनमध्ये धूर पसरला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वैमानिकांनी प्रवाशांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले.

विमानाचे माद्रिद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

घडलेला प्रकार लक्षात येताच वैमानिकांनी इमर्जन्सी आल्यानंतरच्या नियमांचे पालन केले. त्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत हे विमान परत माद्रिद विमानतळावर उतरवण्यात आले. वैमानिकांनी दाखवलेल्या या शौर्याचे आता सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.