BLF ने उडवली पाकिस्तानी सैन्याची झोप, पहिल्यांदाच आत्मघाती महिलेचा वापर, निशाण्यावर चीन

बलुचिस्तानच्या चांगई जिल्ह्यात रविवारी बलोच लिबरेशन फ्रंटने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहा पाकिस्तानी ठार झाले आहेत. हा हल्ला आत्मघाती महिलेने केल्याचे म्हटले जात आहे.

BLF ने उडवली पाकिस्तानी सैन्याची झोप, पहिल्यांदाच आत्मघाती महिलेचा वापर, निशाण्यावर चीन
BLF
| Updated on: Dec 02, 2025 | 11:42 PM

पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या चांगई जिल्ह्यात रविवारी मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पहिल्यांदाच बलोच लिबरेशन फ्रंटच्या (BLF) एका आत्मघाती महिलेने तडीस नेत फ्रंटियर कॉर्प्सच्या (FC) अत्यंत सुरक्षेच्या ठिकाणाला टार्गेट केले आहे. हा तोच परिसर आहे जिथे चीनच्या तांबे आणि सोन्याच्या खाण प्रकल्पांशी संबंधित केंद्रे ( सैंदक आणि रेको डिक ) आहेत. या हल्ल्यात सहा पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याची बातमी आहे. पाकिस्तानने मात्र या संदर्भात काही माहिती दिलेली नाही.

पहिल्यांदाच BLF द्वारा महिलेचा आत्मघाती हल्ला

या हल्ल्याची जबाबदारी घेत BLF ने आत्मघाती हल्लेखोर महिलेचा फोटोही जारी केला आहे. या महिलेचे नाव जरीना रफीक उर्फ तुंग महो असे असल्याचे समजते. तिने परिसरातील बॅरियरवर स्वत:चा विस्फोट करुन उडवून दिले. त्यामुळे आत घुसलेल्या बंडखोरांना मोकळा मार्ग मिळाला. हे BLF साठी या करता देखील महत्वाचे आहे. कारण आतापर्यंत आत्मघाती हल्ल्याची रणनिती केवळ बलोच लिबरेशन आर्मी (BLA) ची मजीद ब्रिगेडद्वारा केली जायची. मजीद ब्रिगेडने अलिकडच्या काळात जाफर एक्सप्रेस हायजॅक सह अनेक मोठे हल्ले केलेले आहेत.

चीन आणि कॅनडाच्या योजनांच्या ठिकाणांना निशाणा

हा हल्ला अशा प्रोजेक्टवर झाला ज्याचा संबंध थेट चीन आणि कॅनेडीयन कंपनीशी होता. यावरुन संकेत मिळतो की आता बंडखोर बलुच राजकीय दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

BLF च्या ‘सेल्फ-सॅक्रिफाईस यूनिट’ची कार्रवाई

हा फिदायीन ( आत्मघाती ) हल्ला संघटनेच्या स्व-बलिदान तुकडी सद्दो ऑपरेशन बटालियनने (SOB) केला असल्याचे टेलिग्रामवर BLF चे प्रवक्ता ग्वाहाराम बलोच यांनी सांगितले. या युनिटचे नाव संघटनेचे शहीद कमांडर वाजा सदो उर्फ सदात मरी यांच्या नावावर ठेवले आहे.

BLA चे 29 हल्ले, 27 पाक सैनिकांचा खात्मा

दुसरीकडे बलोच लिबरेशन आर्मी (BLA) ने 28-29 नोव्हेंबर दरम्यान अनेक स्थानकांवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी घेत या 29 हल्ल्यात 27 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. बीएलएच्या सैनिकांनी काही महामार्गांवर नियंत्रण मिळवले आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा केला जात आहे.