Bomb Blast in Karachi : पाकिस्तानमध्ये कराचीत स्फोट, एक ठार, 10 जण जखमी

गेल्या महिन्यात कराची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कारमध्ये झालेल्या भीषण आत्मघातकी बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह किमान चार जण ठार झाले होते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिनी नागरिकांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

Bomb Blast in Karachi : पाकिस्तानमध्ये कराचीत  स्फोट, एक ठार, 10 जण जखमी
पाकिस्तानमध्ये कराचीत स्फोट
Image Credit source: twitter
| Updated on: May 17, 2022 | 8:03 AM

नवी दिल्ली – पाकिस्तानतील (Pakistan) कराचीमधील (Karachi) खारदार परिसरात भीषण स्फोट झाला आहे. त्यामध्ये सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. कराचीतील न्यू मेमन मशिदीजवळ हा स्फोट झाला आहे. डॉन न्यूज टीव्हीवर दाखवलेल्या फुटेजनुसार कराचीच्या खारदार भागातील न्यू मेमन मशिदीजवळ (Masjid Memon) झालेल्या स्फोटात जीवितहानी झाल्याची भीती दिसत आहे. दूरचित्रवाणीवरील व्हिडीओनुसार पोलिसांनी सांगितले की, मोटारसायकल, रिक्षा आणि कारचे नुकसान झाले आहे. ज्यात मोबाईलचा समावेश आहे. तसेच लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

सर्व स्तरातून त्याचा निषेध करण्यात आला

गेल्या महिन्यात कराची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कारमध्ये झालेल्या भीषण आत्मघातकी बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह किमान चार जण ठार झाले होते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिनी नागरिकांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या घटनेने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्व स्तरातून त्याचा निषेध करण्यात आला. पाकिस्तान इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात एफएटीएमध्ये 16 दहशतवादी हल्ले झाले. ज्यात 21 सुरक्षा कर्मचारी, सात दहशतवादी आणि तीन नागरिकांसह 31 लोक मारले गेले, तर सहा सुरक्षा कर्मचारी आणि चार नागरिकांसह 10 लोक जखमी झाले.

पख्तुनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी 10 हल्ले केले

याच महिन्यात खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी 10 हल्ले केले. ज्यात 12 सुरक्षा कर्मचारी आणि पाच नागरिकांसह 17 लोक ठार झाले.

तर सहा लोक, तीन नागरिक आणि तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.