Bharati Singh Controversy : हात जोडून माफी मागितली तरीही कॉमेडियन भारती सिंह विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

Bharati Singh Controversy : हात जोडून माफी मागितली तरीही कॉमेडियन भारती सिंह विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?
भारती सिंह, कॉमेडियन
Image Credit source: TV9

भारती सिंहने आपल्या एका शो मध्ये दाढी-मिशीवर एक विनोद केला होता. त्यावर शिख समाजातील (Shikh Community) लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तसंच भारतीला ट्रोलही केलं जातंय.

सागर जोशी

|

May 17, 2022 | 12:06 AM

मुंबई : सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh) विरोधात आयपीसी कलम 295 (अ) नुसार एफआयआर दाखल करण्यात आलाय. हा एफआयआर SGPC ने दाखल केलाय. भारतीने मिशी आणि दाढीवर (Beard and mustache)जोक मारला होता, त्यानंतर शिख समुदाय भारतीवर नाराज झाला आहे. तत्पूर्वी मिशी आणि दाढीवरुन भारती सिंहच्या कमेंटचा तीव्र विरोध केला जातोय. भारतीने आपल्या एका शो मध्ये दाढी-मिशीवर एक विनोद केला होता. त्यावर शिख समाजातील (Shikh Community) लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तसंच भारतीला ट्रोलही केलं जातंय. अमृतसरमध्ये काही शिख संघटनांनी भारतीविरोधात निदर्शनंही केली. विरोध वाढत असल्याचं पाहून भारतीने हात जोडून शिख समाजाची माफी मागितली आहे.

दाढी, मिशांवरुन भारतीने केलेल्या टिप्पणीवर एसजीपीसी भारती सिंह विरोधात एफआयआर दाखल करेल. मोहनी पार्क इथे भारतीचं जुनं घर आहे. तिथेत एसजीपीसीने स्पष्टपणे जाहीर केलं की ते भारती सिंह विरोधात एफआयआर दाखल करतील. त्यानंतर आता भारतीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एसजीपीसी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, भारती सिंह विरोधात शिख समाजातील लोक संतापले आहेत.

भारतीचं नेमकं वक्तव्य काय?

भारतीच्या कॉमेडी शोमध्ये टीव्ही अभिनेत्री जॅम्सिन भसीन पाहुणी म्हणून आली होती. जम्सिनसोबत विनोद करताना भारतीने दाढी-मिशा का नको, ते सांगितलं होतं. दूध प्यायल्यानंतर दाढी तोंडात टाकली तर शेवयाची टेस्ट येते. माझ्या अनेक मैत्रिणी ज्यांचं आताच लग्न झालं त्या सर्वजणी दिवसभर दाढी आणि मिशीतून उवा काढण्यात बिझी असतात. भारतीच्या या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

भारतीने हात जोडून माफी मागितली

भारतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत आपल्या त्या वक्तव्याबाबत माफीही मागितली आहे. भारती म्हणाली की, माझा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ मला पाठवून लोक विचारत आहेत की तुम्ही दाढी-मिशीबाबत विनोद केलाय. मी तो व्हिडीओ दिवसातून अनेकदा पाहत आहे आणि मी तुम्हालाही सांगते की तो व्हिडीओ तुम्हीही पाहा’.

भारती पुढे म्हणते की, ‘मी कधीही कोणत्या धर्माबाबत किंवा जातीबाबत बोलले नाही की या धर्माचे लोक दाढी ठेवतात आणि हा प्रॉब्लेम होतो. मी पंजाबी लोकांसाठी नाही बोलले की ते दाढी ठेवतात आणि त्यामुळे अडचण होते. मी जनरल बोलले होते. माझ्या मैत्रिणीसोबत कॉमेडी केली होती. दाढी मिशी आज अनेकजण ठेवतात. पण माझ्या या विनोदामुळे कोणत्याही धर्मातील लोकांना त्रास झाला असेल तर मी हात जोडून माफी मागते. मी स्वत: पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसरमध्ये झालाय. मी पंजाबचा मान ठेवेन आणि मला गर्व आहे की मी पंजाबी आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें