
एका मोठ्या अपघातात एक व्यक्ती पाच तासाहून अधिक वेळ बर्फाच्या खाली गाडला गेला. कुटुंबातील लोक त्याला रुग्णालयात घेऊन गेले. त्यांना वाटले त्याचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी देखील त्याला ब्रेन डेड घोषीत केले आणि लाईफ सपोर्ट काढून त्याला अंतिम संस्कारासाठी सोपवणार होते. इतक्यात असेही काही घडले की त्याला नवीन जीवन मिळाले.
ही कहाणी आहे मॅट पोट्रॅट्ज यांची ते हॉस्पिटलच्या बेडवर होते. त्यांचे कुटुंबिय आणि मित्र बेड भोवती त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. कारण डॉक्टरांनी लाईप सपोर्ट मशीन बंद करण्याच्या विचार करण्यास सांगितले. कुटुंबियांच्या मते रुग्णालयात आणतानाच मॅट याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर कळले की मॅट यांच्या मेंदूत कोणताही प्रतिसाद नव्हता. ते ब्रेन डेड झाले होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांचा लाईफ सपोर्ट काढण्याचा विषय सुरु होता.
मॅट पोट्रॅट्ज यांची कहानी संघर्षाने भरलेली आहे. मिररच्या बातमीनुसार मॅट हे असे दुर्मिळ व्यक्ती आहे जे पाच तास बर्फात जीवंत गाडले गेल्यानंतरही जीवंत वाचले. मॅट यांनी सांगितले की डॉक्टरांनी म्हटले की मी ब्रेन डेड आहे. माझ्या वडीलांना सेंकड ओपिनियन मागितले. ते म्हणाले की जर मॅट माझ्या जागी असता तर त्याने एवढ्या लवकर मला सोडले नसते.
इडाहोत झालेल्या एका हिमस्खलनात ते बर्फाखाली गाडले गेले. त्यामुळे ते एका पर्वतावरुन खाली कोसळले आणि झाडाला धडकून वाईटरित्या जखमी झाले होते. या झटक्याने त्यांचे हेलमेट फाटले आणि त्यांच्या श्वासनलिका बर्फाने भरली. पाच तास ते अशाच स्थिती बर्फात अडकले होते.
जेव्हा डॉक्टर त्यांच्या मृत्यूची अधिकृतपणे घोषणा करण्याची तयारी करीत होते. तेव्हा त्यांचे कुटुंबिय आणि मित्र त्यांच्या बेडजवळ एकत्र जमले होते. सर्वांनी मॅटच्या शरीरावर हात ठेवला आणि रडून ईश्वराकडे दयेची भिक मागितली. मॅटने सांगितले की कुटुंबिय दीड तासांपासून तेथे होते. सर्व जण माझ्या मृत्यूचे सत्य पचवण्याच्या तयारीत असताना. एका माझ्या मित्राने सांगितले की का माहिती नाही पण मला असे वाटते की, मॅटला माहिती आहे की आपण येथे आहोत. आपण पाहूयात का तो आपल्याला प्रतिक्रीया देतोय की नाही.प्रयत्न करुयात का ?
त्यानंतर त्याचा मित्र ओरडला – मॅट, जर तु मला ऐकत असशील तर तुझे डोळे उघड. मॅटने डोळे उघडले नाहीत, परंतू त्याच्या पापण्या हलत होत्या. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना पुन्हा बोलावले. आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला वाटते त्याने प्रतिसाद दिला आहे ? मग नंतर डॉक्टरांनी मला त्याचा हात हलका दाबण्यास सांगितले. मला वाटत त्याच वेळी माझ्यासोबत काही चमत्कार झाला होता आणि मॅट पुन्हा जीवंत झाला.
ही कहाणी आहे २७ वर्षांच्या मॅट यांची आता ते ४४ वर्षांचे झाले आहेत. मॅटने सांगितले हा अपघात मार्च 2009 रोजी झाला होता. ते इडाहो येथील व्यावसायिक स्नोमोबाईल एथलीट होते. त्यांनी चित्रपटाच्या शुटींगसाठी प.अमेरिका आणि कॅनडा दौरा केला होता. मॅटने सांगितले की फिल्म कंपन्यांसाठी आपण व्यावसायिक सायकलिंग केली. अचानक दरड कोसळली आणि ते बर्फात गाडले गेले. त्यांचे संपूर्ण शरीर गाडले गेले होते. माझ्या मित्रांना माझे हॅलमेट त्या ठिकाणी सापडले. तेथे त्यांनी बर्फ खणून मला बाहेर काढले. माझ्या कान, नाक आणि तोंडात सगळा बर्फ गेला होता. श्वसनलिका बंद होती. त्यांनी माझ्या तोंडातील बर्फ काढला आणि श्वसननलिका मोकळी केली.