PoK मध्ये मोठ्या बंडाची तयारी? त्या घोषणेने शहबाज-मुनीर यांची झोप उडाली
PoK Awami Action Committee: पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा उग्र आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. पीओकेमध्ये बंडाळी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अवामी ॲक्शन कमिटीने आता अखेरच्या लढ्याची हाक दिली आहे. पाकिस्तानच्या सरकारची झोप उडाली आहे.

PoK Awami Action Committee: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये बंडाचे वारे आहे. गेल्या वर्षभरात इथल्या जनतेने पाकिस्तानी लष्कर, पोलिसांना अनेकदा बेदम मारत पिटाळून लावले. येथील संसदेत पाकिस्तानी नागरिकांना प्रतिनिधीत्व देण्याचा मुद्दा वादाचे कारण ठरला आहे. पीओकेमधील रावलकोट येथे गेल्या 112 दिवसांपासून विरोध प्रदर्शन सुरू आहे. आता अवामी ॲक्शन कमिटीने आता अखेरच्या लढ्याची हाक दिली आहे. पाकिस्तानच्या सरकारची झोप उडाली आहे. 28 सप्टेंबर रोजी निर्णायक लढ्याची हाक देण्यात आली. 4 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू होईल. या आंदोलनासाठी अन्नधान्याचा साठा करून ठेवण्याचे सूचना कमिटीने जनतेला केली आहे.
पाकिस्तानविरोधात निर्णायक लढा
पाकव्याप काश्मीरमधील नागरिकांनी 3 ऑक्टोबरपर्यंत पुढील दोन महिन्यांचे अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तूंची तजवीज, साठा करून ठेवण्याचे आवाहन अवामी ॲक्शन कमिटीने केली आहे. गेल्यावर्षी 4 ऑक्टोबर रोजी पाकने काश्मीरी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप कमिटीने केला आहे. या फसवणुकीला एक वर्षे पूर्ण होत आहे. आता निर्णायक लढ्याची घोषणा करण्यात आली आहे. कमिटीने घरांवर पीओकेचा स्वतंत्र झेंडा फडकवण्याचे नागरिकांना आणि पाकिस्तानी झेंडे काढून फेकण्याचे प्रशासनाला आवाहन केले आहे.
सरदार अमान खान म्हणाले काय?
दोन दिवसांपूर्वी भारतीय नियंत्रण रेषेजवळील मंढोल गावात काश्मीर खोऱ्यातील, 25 हजार लोक जमले होते. त्यांना कमिटीचे सदस्य सरदार अमान खान यांनी निर्णायक लढ्याचे आवाहन केले. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला हटवून भारतातील पुंछ आणि मेंढर जोडण्याची मागणी केली. त्यांनी एकत्रित काश्मीरची हाक दिली. त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी आणि पोलिसांचा हस्तक्षेपाला विरोध केला. या आंदोलनासाठी पीओकेमधील जनतेने दोन महिन्यांचे राशन, अन्नधान्य साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहबाज सरकारची उडाली झोप
4 ऑक्टोबर रोजी इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने इस्लामाबादमध्ये लाँग मार्चची हाक दिली आहे. खैबर पख्तूनख्वाहचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांच्या नेतृत्वात लाखो पीटीआय कार्यकर्ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादकडे कूच करतील. तर दुसरीकडे पीओकेमध्ये त्याच दिवसापासून निर्णायक लढा सुरू होणार असल्याने शहबाज आणि मुनीर जोडगोळीची झोप उडाली आहे.