भारताची ताकद पाहून चीन नरमला, भारतावर कोणीही दबाव टाकू शकत नाही.. चीनने थेट..

भारतात ब्रिक्स परिषद पार पडली. जवळपास सर्वच सदस्य देशांनी या परिषदेला हजेरी लावली. याला फक्त बांगलादेश उपवाद राहिला. आता या ब्रिक्स परिषदेबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची माहिती पुढे येत आहे.

भारताची ताकद पाहून चीन नरमला, भारतावर कोणीही दबाव टाकू शकत नाही.. चीनने थेट..
BRICS summit China india
| Updated on: Sep 15, 2026 | 8:23 AM

चीनचे विदेशमंत्री वांग यी सोमवारी ब्रिक्स परिषदेत सहभागी झाले होते. दोन्ही देशातील व्दिपक्षीय संबंध वाढवण्यावर भर दिला जात आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, वांग यांनी म्हटले की, जिनपिंग यांनी दोन्ही देशांनी सन्मान आणि राजनैतिक थांबलेली चर्चा दूर करावी. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. भारत नेहमी भारत आणि चीन यांच्यातील संबंध अधिक काळ पुढे जातील, हे बघतो. हेच नाही तर वांग यांनी म्हटले की, आमच्या दोन्ही देशातील संबंध इतके जास्त स्पष्ट आहेत की, तिसरा देश कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू शकत नाही. चीनच्या विदेश मंत्रालयाने मोठे विधान करत म्हटले की, सर्वात महत्वाचे म्हणजे भारत आणि चीन सहयोगी देश म्हणून काम करतील. यासोबतच जिनपिंग यांनी भारताचे काैतुक केल्याचेही वांग यांनी म्हटले.

एस. जयशंकर यांनी म्हटले की, ब्रिक्स परिषदेत सर्वांनी एकमताने निर्णय घेतले. जयशंकर यांनी म्हटले की, त्यादिवशीचा सर्वात कठीण विषय होता की, पश्चिम आशियातील संघर्षय… आम्ही एक असे विधान करण्यास पुढे आलो, ज्यावर सर्वांची सहमती होती. ब्रिक्स परिषद सदस्य देश पश्चिमी आशियातील संघर्ष संयुक्त अरब अमिरात आणि इराण यांच्यातील मतभेद दूर करत नवी दिल्ली घोषणापत्र बनवले.

इराणवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये थेट अमेरिकेचे नाव घेणे टाळले. इराण आणि युएई आपल्या मतांवर ठाम होते. दोघेही ऐकण्यास तयार नव्हते. दोन्ही देशांना मनावणे हे मोठे आवाहन होते. नरेंद्र मोदी, शी जिनपिंग, व्लादीमीर पुतिन, मसूद पेजेश्कियान, युवराज मोहम्मद बिन जायद या नेत्यांनी मिळून घोषणा केली.

ब्रिक्स परिषदेकडे बांगलादेशने पाठ फिरवली. ब्रिक्स सदस्य देशाला भारताने निमंत्रण पाठवले. आमचे पंतप्रधान तारीक रहमान यांना भारताने निमंत्रण पाठवले नसल्याने बांगलादेशने म्हटले. त्यानंतर त्यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. ब्रिक्स परिषदेला भारतात जाण्याचा काही संबंधच येत नसल्याचे बांगलादेशने म्हटले. दोन्ही देशात तणाव वाढताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us