Osman Hadi: उस्मान हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून फरफटत आणा, नाहीतर…इंकलाब मंचाची मोठी धमकी, भारत-बांगलादेश सीमेवर वाद भडकणार?

Osman Hadi Bangladesh: शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात प्रमुख भूमिका निभावलेला उस्मान हादी याच्यावर सिंगापूरमध्ये गोळी झाडण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता भारत आणि बांगलादेश बॉर्डरवर तणाव वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. काय आहे अपडेट?

Osman Hadi: उस्मान हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून फरफटत आणा, नाहीतर...इंकलाब मंचाची मोठी धमकी, भारत-बांगलादेश सीमेवर वाद भडकणार?
उस्मान हादी इंकबाल मंच
Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 19, 2025 | 11:35 AM

India-Bangladesh Border: माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार गेल्यावर्षी उलथवण्यात आले. विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी नेत्याचा त्यासाठी वापर करण्यात आला. यामध्ये शरीफ उस्मान हादी हा सर्वात पुढे होता. जुलै महिन्यात त्याने बंड पुकारले होते. ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांना जीव वाचवत भारतात आश्रय घ्यावा लागला होता. सिंगापूरमध्ये 18 डिसेंबर 2025 रोजी त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. त्याला तातडीने सिंगापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याची प्राणज्योत मालवली. तेव्हापासून बांगलादेशमध्ये जाळपोळ सुरू आहे. देशभरात हिंसेचे लोण पसरले आहे. इंकबाल मंचाने आता भारतातून शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये आणून शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ही हत्या शेख हसीना यांच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचा इंकबाल मंचाचा आरोप आहे. शेख हसीना यांना लवकर अटक करून देशात आणले नाहीतर देश ठप्प करण्याचा इशारा मंचाने दिला आहे. या ताजा घटनेमुळे भारत-बांगलादेश सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर लवकरच देश ठप्प

गुरुवारी इंकलाब मंचाने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार जर शरीफ उस्मान हादी हे शहीद झाले आहेत. त्यांनी देशासाठी जीव दिला. त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर भारतातून आणा. देशाची एकजुटता आणि सार्वभौमत्वासाठी आता निकराचा लढा देण्याची वेळ आली आहे. जर लवकर कार्यवाही झाली नाही तर शाहबाग येथे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाचे लोण देशभर पसरेल आणि बांगलादेश ठप्प होईल हे लक्षात ठेवा असा सज्जड दम इंकबाल मंचाने युनूस सरकारला दिला आहे.

हा बांगलादेशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला

इंकबाल मंचाच्या आरोपानुसार हा हल्ला एका व्यक्तीवर नाही तर देशाच्या सार्वभौमत्वावर करण्यात आला आहे. आरोपी हे भारतातून आले. त्यांनी रेकी केली आणि सिंगापूरमध्ये त्यांच्या नेत्यावर गोळीबार केला. हल्लेखोर हे परत भारतात पळून गेले आहेत. त्यांना फरफटत बांगलादेशात आणा. त्यांच्यावर रीतसर खटला भरा आणि त्यांना शिक्षा करा अशी मागणी या संघटनेने केली आहे.

भारत-बांगलादेश बॉर्डरवर तणाव?

सध्या राजधानी ढाका आणि इतर शहरात हिंसेचे लोण पसरले आहे. यात अल्पसंख्यांक समुदायाला सुद्धा टार्गेट करण्यात आल्याचा काहींनी दावा केला आहे. आंदोलनकर्त्यांनी काही वृत्तपत्र, वृत्त वाहिन्यांच्या कार्यालयांना आग लावली आहे. तर अनेक ठिकाणी मोठी तोडफोड केली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. हिंसेचे लोण देशभरात पसरले आहे. आता भारत आणि बांगलादेश बॉर्डरवर तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप याविषयीचे कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही.