AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! इराण अमेरिका युद्धात थेट अरबी समुद्रात मोठी खळबळ, चक्क या देशाचा युद्धात..

इराण आणि अमेरिका युद्धात अजून एक देश अमेरिकेच्या बाजूने पुढे येताना दिसत आहे. ज्यानंतर इराणकडून थेट धमकी देण्यात आली. ब्रिटनने आपला लष्करी तळ वापरण्याची परवानगी अमेरिकेला दिली. यादरम्यानच अमेरिकेकडून धक्कादायक पाऊल उचलण्यात आले.

जगात हाहाकार! इराण अमेरिका युद्धात थेट अरबी समुद्रात मोठी खळबळ, चक्क या देशाचा युद्धात..
Iran and America war
| Updated on: Mar 22, 2026 | 8:34 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 21 वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर मोठे हल्ले करत आहे. मात्र, इराण हार मानताना दिसत नाही. मोठे हल्ले इराणकडून केले जात आहेत. अमेरिकेने ज्या युद्धाचा विचारही केला नव्हता, असे युद्ध इराण लढत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यादरम्यान म्हटले होते की, हे युद्ध चार आठवडे चालेल. मात्र, सध्याची परिस्थिती बघता इराण इतक्या लवकर पराभव स्वीकारणार नाही हे स्पष्ट आहे. उलट इस्त्रायल आणि अमेरिकेच्या नाकात दम इराणने केला. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने जगातील अनेक देश अमेरिकेच्या विरोधात आहेत. कोणत्याही परिस्थितीत होर्मुज खाडी सुरू करण्यात यावी, याकरिता दबाव टाकला जात आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू असताना वारंवार या युद्धात थेट ब्रिटनचे नाव पुढे येताना दिसत आहे. इराणकडून थेट मोठा इशाराही ब्रिटनला देण्यात आला.

यादरम्यानच आता ब्रिटनने आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन करत अरबी समुद्रात अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी तैनात केली आहे, ज्याने मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर इराण अमेरिका युद्धात ब्रिटनही सहभागी होत आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, एचएमएस अ‍ॅन्सन नावाची ही पाणबुडी टोमाहॉक ब्लॉक IV क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे आण अत्यंत घातक हल्ले करू शकते.

शेकडो दूर असलेल्या टार्गेटवरही ही पाणबुडी हल्ला करू शकते. इराण अमेरिकेच्या युद्धात ब्रिटनने आपला सैन्य बेस अमेरिकेला वापरण्याची अगोदरच परवानगी दिली आहे. होर्मुज मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. आता ब्रिटनच्या सैन्य बेसवरून इराणच्या होर्मुजमधील सैन्यावर मोठे मारे आणि क्षेपणास्त्राने थेट हल्ला अमेरिका करू शकते.

अमेरिकेकडून अगोदरच इराणला धमकी देण्यात आली की, 48 तासांमध्ये तुम्ही होर्मुज खाडी सुरक्षित उघडी करा. यावर इराणकडून थेट उत्तर देण्यात आले असून इराणने स्पष्ट शब्दात सांगितले की, आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची हिमत केली तर आम्ही संपूर्ण क्षेत्रात असलेल्या अमेरिकेसंबंधत कंपन्यांवर थेटपणे हल्ला करणार आहोत. ब्रिटनला मोठा इशारा इराणकडून अगोदरच देण्यात आला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?