AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

El Nino : मध्य अमेरिकेत मोठं संकट, तीन देशांत थेट आणीबाणी जाहीर, पाऊस गायब; कारण काय?

होंडुरासने अदोजर 19 ऑगस्ट रोजी दुष्काळाची आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर एका आठवड्याने म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी रेड अलर्टचा विस्तार 103 नगरपालिकांपर्यंत करत असल्याचे जाहीर केले. अल साल्वाडोरमध्ये पर्यावरण मंत्रालयाने 25 ऑगस्ट रोजी देशव्यापी रेड अलर्ट जारी केला.

El Nino : मध्य अमेरिकेत मोठं संकट, तीन देशांत थेट आणीबाणी जाहीर, पाऊस गायब; कारण काय?
al nino affectImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 9:27 PM
Share

El Nino Effect : सध्या जगावर अल निनोचे मोठे संकट आले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे जगातील अनेक देशांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. भारतातील पावसावरही त्याचा परिणाम होत आहे. पाऊस कमी झाला तर अनेक देशांवर दुष्काळाचं तसेच अन्नधान्य टंचाईचं संकट उभं राहू शकतं. दरम्यान, अल निनोच्या तीव्र प्रभावामुळे मध्य अमेरिकेतील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्याची स्थिती लक्षात घेऊन मध्य अमेरिकेतील एकूण तीन देशांत थेट इमर्जन्सी म्हणजेच रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे.

मका आणि बीन्सची पिके मोठ्या प्रमाणात हातातून गेली

ग्वाटेमालामध्ये दुष्काळामुळे 32 लाखांहून अधिक लोकांना तातडीच्या मानवतावादी मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. युरोपियन कमिशनच्या संयुक्त संशोधन केंद्राच्या अहवालानुसार, या भागातील मका आणि बीन्सची पिके मोठ्या प्रमाणात हातातून गेली आहेत. अन्नधान्याचे उत्पादन थांबलेले आहे सोबतच पाण्याचे संकट वाढल्यामुळे अन्नसुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती लक्षात घेता होंडुरास, अल साल्वाडोर आणि पनामा या तीन देशांमध्ये आणीबाणी म्हणजेच रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पनामा सरकारनेही 25 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली

होंडुरासने अदोजर 19 ऑगस्ट रोजी दुष्काळाची आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर एका आठवड्याने म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी रेड अलर्टचा विस्तार 103 नगरपालिकांपर्यंत करत असल्याचे जाहीर केले. अल साल्वाडोरमध्ये पर्यावरण मंत्रालयाने 25 ऑगस्ट रोजी देशव्यापी रेड अलर्ट जारी केला. येथे उष्णता वाढत आहे. पनामा सरकारनेही 25 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. देशातील 11 प्रमुख जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी कमी झाले आहे. त्यामुळे तेथे जलविद्युत निर्मितीचे संकट उभे राहिले आहे. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासही अडचणी येत आहेत.

अत्यंत गंभीर हवामान संकट

सध्याच्या या स्थितीचा अनेक हवामान तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. या तज्ज्ञांच्या मते सध्या समोर आलेली स्थिती ही सर्वसामान्य नाही. हे एक गंभीर संकट आहे. अल साल्वाडोर येथे मे महिन्यात 41 टक्के पाऊस कमी झाला. ऑगस्टमध्ये 19 दिवस पाऊसच झाला नाही. त्यामुळे येथे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात मध्य अमेरिकेतील अन्य देशांवरही असे संकट येऊ नये अशी प्रार्थना आता केली जात आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा