AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या पश्चिमी सीमेवर धक्कादायक हालचाली, चीनने दिली थेट साथ, तब्बल 250..

चीन आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसतंय. भारताविरोधात चीन पाकिस्तानला साथ देत आहे. भारतही अलर्ट मोडवर आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या सीमेदरम्यान मोठा निर्णय घेतला. ज्याने तणाव अधिक वाढला.

पाकिस्तानच्या पश्चिमी सीमेवर धक्कादायक हालचाली, चीनने दिली थेट साथ, तब्बल 250..
Pakistan India Western Border
| Updated on: Aug 03, 2026 | 9:20 AM
Share

पाकिस्तानची पार वाट लागली आहे. पण भारताच्या नादी लागण्याचे काम अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. महागाई, अर्थव्यवस्थेवरील दबाव आणि जागतिक बाजारातून घेतलेले कर्ज यामुळे पाकिस्तान संकटात आहे. मात्र, असे असले तरीही पाकिस्तान भारताविरोधात काड्या करतच आहे. पाकिस्तानने अलीकडेच चीनकडून 250 ‘SH-15’ 155 मिमी ट्रक-माउंटेड सेल्फ-प्रोपेल्ड आर्टिलरी सिस्टिम्स मिळवल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानने हे भारतासोबतच्या पश्चिमी सीमेवर तैनात करण्याच्या कामालाही सुरूवात केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने विचार केला नाही, असे प्रतिउत्तर भारताने पाकिस्तानला दिले. ज्यामुळे पाकिस्तानने धसका घेतला. पाकिस्तानच्या लष्कराला भारताने पळता भुई कमी केली. भारताच्या लष्करी ताकदीपुढे उभे राहण्याची हिमत पाकिस्तानची झाली नाही.

खायचे वांदे असताना भारताविरोधात लढण्यासाठी मोठंमोठे शस्त्र पाकिस्तान खरेदी करत आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ते दक्षिण अशा विस्तारलेल्या मोक्याच्या ठिकाणी या अति-हालचालक्षम हॉवित्झर्सची तैनाती केली जात आहे. ज्यामुळे भारत अधिक अलर्ट झाल्याचेही बघायला मिळतंय. पाकिस्तानला हे हॉवित्झर्स चीनकडून मिळाली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यातील संबंध चांगली आहेत. मात्र, पाकिस्तानची पुन्हा एकदा मदत करताना चीन दिसत आहे. भारताविरोधात लढण्यासाठी चीन पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करत आहे. मित्र मित्र म्हणून भारताच्या पाठीत खंजीर खुपसताना चीन दिसत आहे. चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरोधात मोठा कट तर रचत नाहीत ना असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

रावळपिंडीने आता आपल्या जमिनीवरील संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी या आधुनिक प्रणालींना प्राधान्य दिले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरच पाकिस्तानने हे पाऊस उचलले. 250 युनिट्स तोफखान्याच्या अनेक रेजिमेंट्सना सुसज्ज करण्यासाठी पुरेशी आहेत. पाकिस्तानच्या मारक क्षमतेत मोठा बदल घडून येणार आहे. दुसरीकडे भारतानेही कंबर कसली आहे. पाकिस्तानने पश्चिमी सीमेवर 250 हॉवित्झर तोफा तैनात केल्या आहेत. या तोफा 72 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहेत.

भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीच तसे चांगले राहिले नाहीत. भारतात दहशतवादी कारवाया कायमच पाकिस्तानकडून घडवून आणल्या जातात. त्यामध्येच भारताने सिंधू जल करार स्थगित केला. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तान भारतावर मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक कोर्टात पाकिस्तानने हा मुद्दा मांडला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी