दारू विकून हा देश बनला श्रीमंत, भारतातील एक व्यक्ती किती लिटर दारू पितो, देशाला किती महसूल मिळतो?

Alcohol: भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. अमेरिका आणि ब्रिटनमध्येही मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते. त्यामुळे जवळपास प्रत्येक देशात दारूचे उत्पादन केले जाते. जगात असा एक देश आहे ज्याने दारू विकून प्रचंड पैसा कमवला आहे.

दारू विकून हा देश बनला श्रीमंत, भारतातील एक व्यक्ती किती लिटर दारू पितो, देशाला किती महसूल मिळतो?
Daru
| Updated on: Nov 10, 2025 | 5:25 PM

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. अमेरिका आणि ब्रिटनमध्येही मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते. त्यामुळे जवळपास प्रत्येक देशात दारूचे उत्पादन केले जाते. तसेच मोठ्या प्रमाणात दारूचा व्यापारही केला जातो. जगात असा एक देश आहे ज्याने दारू विकून प्रचंड पैसा कमवला आहे. हा देश कोणता आहे आणि या देशाने किती संपत्ती कमवली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ग्रँड व्ह्यू रिसर्चच्या रिपोर्टनुसार चीनने दारू विकून प्रचंड पैसा कमावला आहे. इन्फोग्राम वेबसाइटनुसार 2018 मध्ये चीनने दारूपासून सर्वाधिक कमाई करत अंदाजे 23.7 लाख कोटी रुपयांची कमाई केली. 2023 मध्ये चीनने बिअर विकून सर्वाधिक महसूल मिळवला आहे. आता 2030 पर्यंत चीनच्या अल्कोहोलिक ड्रिंक्सचे अंदाजे 19.1 लाख कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. कारण 2025 ते 2030 दरम्यान या क्षेत्राचा ग्रोथ रेट 10.1% राहण्याची अपेक्षा आहे.

चीनमधील शहरी लोकसंख्या वाढत आहे, तसेच जीवनशैलीतील होणारा बदल आणि प्रीमियम पेयांच्या वाढत्या मागणीमुळे महसूलात वाढ झाली आहे. मार्केटिंग टू चायना या वेबसाईटच्या माहितीनुसार, मध्यमवर्गीय लोकांमध्ये अल्कोहोलची मागणी वाढली आहे. लोक आता पारंपारिक बायज्यू ऐवजी वाइन, स्पिरिट्स आणि हार्ड सेल्टझर या पेयांकडे लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे आगामी काही वर्षात वाइन महसूल 45.15% वाढण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन विक्री

चीनमध्ये मद्याची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन विक्री होताना दिसत आहे. 55 % चिनी लोक ऑनलाइन ऑर्डर करतात. त्यामुळे विक्री वाढण्यात ई-कॉमर्स आणि सोशल मीडियाचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे प्रीमियम वाइन, क्राफ्ट बिअर आणि हार्ड सेल्टझर या ड्रिंक्स जास्त लोकप्रिय होताना दिसत आहेत.

भारतात किती दारू प्यायली जाते?

चीनसह भारत आणि अमेरिकेतही दारूला मोठी मागणी आहे. सीआयए वेबसाइटनुसार, चीनमध्ये 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची व्यक्ती सरासरी 4.48 लिटर अल्कोहोल पिते. अमेरिकेत सरासरी 8.93 लिटर आहे आणि भारतात सरासरी 3.09 लिटर दारू पिली जाते. भारताने दारू विक्रीतून 5.63 लाख कोटी रूपये नफा कमवला आहे.