लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांची तंतरली, ॲपलच्या कंपनीत एकच खळबळ; कुणी भिंतीवरून उड्या मारल्या तर कुणी…

| Updated on: Oct 31, 2022 | 5:19 PM

सध्या चीनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चीनमधील अनेक शहरातून लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे.

लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांची तंतरली, ॲपलच्या कंपनीत एकच खळबळ; कुणी भिंतीवरून उड्या मारल्या तर कुणी...
Follow us on

बीजिंगः सध्या चीन कोरोना विषाणूच्या भीषण संकटाबरोबर लढत आहे. काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊनही लागू करण्यात आले आहे. कोरोनामुळेच झेंगझोऊमध्येही असाच लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अ‍ॅपल आयफोन बनविणाऱ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगार आणि इतर मजुरांची आता पळापळ सुरू झाली आहे. सर्वजण पायी आपापल्या घराकडे निघाले आहेत.

त्यासाठी ते रात्रंदिवस 100 किमीचा प्रवास करत आहेत. येथील नागरिक पायीच चालत निघाल्याने त्यांना आता अन्न आणि पाण्याची टंचाई भेडसावत आहे.

सध्या चीनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चीनमधील अनेक शहरे कोरोनाग्रस्त झाली आहेत. चीनमधील बीबीसीचा पत्रकार स्टीफन मॅकडोनेल यांनी एका ट्विटमध्ये चीनमधील कोरोना लॉकडाऊनची माहिती देताना म्हटले आहे की, झेंगझोऊमधील फॉक्सकॉनमध्ये झिरो कोविड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

ही अॅपल कंपनीची प्रमुख असेंब्ली साइट आहे. हा लॉकडाऊन टाळण्यासाठी तिथे काम करणारे लोक आणि मजूर आता कंपनीतून आपापल्या घरी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत.

अॅपलच्या या कंपनीतून हे कर्मचारी व कामगार पायीच घरी जात असल्याची माहिती आता वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यासाठी ते 100 किमीपर्यंतचा पायी प्रवास करत आहेत. कोविड टाळण्यासाठीच त्यांच्याकडून हा प्रवास सुरू झाला आहे.

कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ नये यासाठी कठोर नियम लागू केले गेले आहेत. चीनमधील या घटनेचे काही व्हिडिओही चिनी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत.

झेंगझोऊ शहरातील अॅपल कंपनीचे कर्मचारी कंपाऊंडच्या जाळ्यावर चढून बाहेर येतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारण अनेक लोकाना क्वारंटाईन केले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.

झेंग्झू येथे असलेली फॉक्सकॉन कंपनी या कारखान्याची मालक आहे. येथे त्यांनी अॅपलचा आयफोन बनवण्यासाठी 3 लाख कामगारांना कामावर घेतले आहे.

जगात जे आयफोन पाठवले जातात त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त याच कंपनीत बनवले जातात. चीनच्या व्हिडीओ होस्टिंग सर्व्हिस डॉयिनच्या म्हणण्यानुसार, तेथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

त्यामुळे अन्नधान्य व इतर वस्तूंचा तुटवडाही निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतुकीची साधने बंद असल्याने हे लोक पायी घरी जात आहेत.