आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेला झटका, मोठा भूकंप, भारताने करून दाखवले, थेट चीनने…

रशियाचे अध्यक्ष पुतिन भारताच्या दाैऱ्यावर होते. यादरम्यान काही महत्वाचे करार दोन्ही देशांमध्ये झाली. आता पुतिन यांच्या भारत भेटीवर पहिल्यांदाच चीनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चीनने मोठे जागतिक संकेत यावेळी दिली आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेला झटका, मोठा भूकंप, भारताने करून दाखवले, थेट चीनने...
Vladimir Putin india and China
| Updated on: Dec 09, 2025 | 11:03 AM

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसाच्या भारत दाैऱ्यावर होते. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. विशेष म्हणजे यादरम्यान मोठे व्यापार करार दोन्ही देशांमध्ये झाले. पुतिन सात रशियन मंत्र्यांसोबत भारतात पोहोचले होते. अनेक मोठे करार करून गेले. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट झाली होती. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर चीन देखील भारताच्या जवळ आला. भारतासोबत महत्वाचे करार चीनने केले. व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दाैऱ्याबद्दल चीनने आता मोठे विधान केले. विशेष म्हणजे पुतिन यांच्या भारत दाैऱ्याबद्दल त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. चीनने म्हटले की, भारत, चीन आणि रशियामधील मजबूत त्रिपक्षीय संबंध केवळ प्रादेशिकच नव्हे तर जागतिक स्थिरता यासोबतच शांततेसाठी महत्वाचे आहेत.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत, चीन आणि रशिया हे उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहेत आणि जागतिक दक्षिणेचे महत्त्वाचे आवाज आहेत. विकास आणि समृद्धीलाही हातभार लावत आहेत. त्रिपक्षीय सहकार्य मजबूत ठेवणे सर्व देशांच्या हिताचे आहे. आशिया आणि जगाच्या स्थिरतेसाठी फायदेशीर ठरेल. चीनने केलेले हे विधान अमेरिकेसाठी नक्कीच धक्का देणार आहे.

भारत, रशिया आणि चीन यांच्यामधील नात्यावर चीनने थेट भूमिका घेतली. हेच नाही तर त्यांनी या समीकरणाला त्रिपक्षीय म्हटले. चीनच्या परराष्ट्राने या तीन मोठ्या शक्ती असल्याचे म्हटले. 2020 मधील तणावानंतर भारत आणि चीनच्या नात्याबद्दल सुधारणा बघायला मिळतंय. त्यामध्येच रशियामुळे हे संबंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर थेट भारताच्या बाजूने भूमिका घेताना चीन दिसला.

भारत भेटीपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पुतिन यांनी भारत आणि चीन हे रशियाचे सर्वात जवळचे मित्र म्हटले होते. दोन्ही देश त्यांचे वाद स्वतःहून सोडवू शकतील असा विश्वास व्यक्त केला होता. आता खरोखरच चीन आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत होत आहेत. हा भविष्यात अमेरिकेसाठी अत्यंत मोठा धोका नक्कीच म्हणावा लागेल. पुढील काही काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्णपणे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.