रघुराम राजन यांचा हादरवणारा खुलासा, पाकिस्तानचे थेट काैतुक, म्हणाले, रशियन तेल कधी…
Raghuram Rajan : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतिन नुकताच भारत दाैऱ्यावर होते. अमेरिकेसाठी खरोखरच हा अत्यंत मोठा धक्का होता. त्यामध्येच आता रघुराम राजन यांनी मोठा दावा केलाय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावला. मात्र, याबद्दल मोठा खुलासा करण्यात आला असून रशियाकडून भारत तेल खरेदी करतो म्हणून टॅरिफ लावत आहे, हे फक्त जगाला दाखवण्यासाठी सांगण्यात आले. तेलाचा काही मुद्दाच यामध्ये नव्हता. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या मोठ्या शुल्काचा भारताने रशियन तेल खरेदी करण्याशी काहीही संबंध नव्हता. भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचे श्रेय कोणाला घ्यावे यावरील राजनैतिक मतभेदातून ही परिस्थिती उद्भवली. डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत-पाकिस्तान युद्ध थांबवण्याचे श्रेय घ्यायचे होते. मात्र, भारताने ते करण्यापासून त्यांना रोखले आणि परिस्थिती काय आहे हे जगाला सांगितले.
यूबीएस सेंटर फोरम फॉर इकॉनॉमिक डायलॉगमध्ये बोलताना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अनेक गोष्टींवर खुलासा केला. त्यांनी म्हटले की, या सर्व वादात पाकिस्तानची भूमिका चांगली राहिली. त्यांनी भारताच्या दाव्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान अजिबातच खोडले नाही. यामुळे त्यांना त्याचा फायदा थेट झाला. पाकिस्तानवर फक्त 19 टक्के टॅरिफ आहे तर भारतावर 50 टक्के टॅरिफ लागला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने असा युक्तिवाद केला की, ट्रम्प यांच्याशिवाय दोन्ही देशांमध्ये करार झाला होता. मात्र, भारताच्या विधानावर किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर पाकिस्तानने आपली भूमिका अजिबातच जाहीर केली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने त्यांचा दावा खोडून काढला यामुळे फक्त रशियन तेलाचा मुद्दा पुढे करत भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला.
मुळात म्हणजे फक्त भारतच नाही तर अमेरिका स्वत: रशियाकडून ऊर्जा खरेदी करते. चीन हा सर्वात मोठा रशियाकडून तेल खरेदी करणारा जगातील देश आहे, त्या चीनवरही कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. भारत अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर वेगवेगळी मार्ग शोधतान स्पष्टपणे दिसला. अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही. उलट पुतिन यांच्या भारत दाैऱ्यादरम्यान अनेक ऊर्जा करार करण्यात आली.
