चीनच्या दाव्याने जग हादरले! डोनाल्ड ट्रम्प यांना पाडले तोंडावर, 100 टक्के टॅरिफवर थेट…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयानंतर भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगलेच संबंध ताणले आहेत. हेच नाही तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एखाद्या हत्याराप्रमाणे वापरताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. आता त्यांनी मोठी मागणी केली.

चीनच्या दाव्याने जग हादरले! डोनाल्ड ट्रम्प यांना पाडले तोंडावर, 100 टक्के टॅरिफवर थेट...
donald trump and china
| Updated on: Sep 14, 2025 | 8:32 AM

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धासाठी भारताला जबाबदार धरताना दिसले. हेच नाही तर अमेरिकेने भारताला रशियाची कपडे धुण्याची मशिन देखील म्हटले. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. मात्र, फक्त भारतच नाही तर अमेरिकेलाही या टॅरिफची झळ सोसावी लागतंय. अमेरिकेत भारतावरील टॅरिफनंतर महागाई गगनाला भिडलीये. भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली. मात्र, अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताच्या मागे खंबीरपणे रशिया उभा आहे. हेच नाही तर भारतीय वस्तूंचे आम्ही आमच्या बाजारपेठेत स्वागत करू, असे थेट रशियाने म्हटले.

आता भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोर्चा थेट चीनकडे वळाला आहे. स्वत: चीनवर टॅरिफ न लावता त्यांनी नाटो देशांना पत्र लिहित चीनवर 100 टक्के टॅरिफ लावा अशी मागणी केली आहे. चीन हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे जो रशियाकडून तेल खरेदी करतो. यामुळे अमेरिकेची इच्छा आहे की, काहीही झाले तरीही चीनने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे. चीनने देखील आता डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिल्याचे बघायला मिळतंय.

चीनने अमेरिकेवर निशाणा साधत थेट म्हटले की, ना आम्ही कोणत्याही युद्ध कटात सहभागी झाली नाही किंवा त्यात सहभागी नाही. युक्रेन आणि रशिया युद्ध अमेरिकेनेच भडकवल्याचे सांगितले जाते. युक्रेनला हाताशी धरून त्यांनी रशियाला संपवण्यासाठी कट रचला होता. मात्र, आता तो त्यांच्यावरच उलट पडल्याने त्यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवले जातंय. आता त्यावरच बोट ठेवत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट उत्तर दिले.

स्लोव्हेनियाच्या भेटीदरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, मुळात म्हणजे युद्ध हा कोणत्याही गोष्टीवरील समाधान नक्कीच नाहीये. निर्बंधांमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते. अमेरिकेला टोला लगावत त्यांनी म्हटले, चीन युद्धात कट रचत नाही किंवा भाग घेत नाही…या वाक्यातून त्यांनी अमेरिकेने रशिया आणि युक्रेनच्या युद्धात काय केले हेच थेट दाखवून दिले आहे.