मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी झाडले हात, थेट केला मोठा दावा, म्हणाले, हे माझे नाही तर…
डोनाल्ड ट्रम्प हे संपूर्ण जगाला सातत्याने टॅरिफची धमकी देताना दिसत आहेत. भारतानंतर आता त्यांच्या निशाण्यावर अमेरिका असल्याचे स्पष्ट दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जगाला हादरवणारा मोठा दावा केलाय.

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया युद्धात मध्यस्थी करत आहेत. मात्र, या युद्धात मध्यस्थी करण्यामागे त्यांचा मोठा गेम आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. आता त्यांनी या वादात थेट नाटोला देशांनाही ओढले आहे. आता भारतानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर चीन आहे. चीनला कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेने लावला नाहीये. मात्र, चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा जगातील पहिला मोठा देश आहे. स्वत: चीनवर टॅरिफ न लावता नाटोला पत्र लिहित त्यांनी चीनवर 100 टक्के किंवा 50 टक्के टॅरिफ लावण्याची मागणी केली. जर चीनने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर त्याचा थेट वाईट परिणाम हा रशियावर होईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प हे बरेच प्रयत्न करूनही रशिया युक्रेन युद्ध थांबू शकत नाहीये. उलट त्यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धातून हात झटकल्याचे बघायला मिळतंय. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हे युद्ध माझे नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन आणि वोलोदिमिर जेलेंस्की यांचे आहे. मी फक्त हे युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करतोय.
कारण या युद्धामुळे लोकांचे जीव जात आहेत. आतापर्यंत 7,118 युक्रेनी नागरिक मारले गेले आहेत. मी फक्त त्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. नाटो देश या प्रकरणात हस्तक्षेप करत नाहीत. जर त्यांनी तसे केले तर हे युद्ध थांबेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, नाटो देश युद्ध संपल्यानंतर लावलेला अधिक टॅरिफ देखील काढू शकतात. मात्र, हे युद्ध संपेपर्यंत टॅरिफसोबतच काही निर्बंध लादणे देखील आवश्यक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या कारवाईनंतर त्यांची दुटप्पी भूमिका जगापुढे आली. आता चीनविरोधातही डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मुळात म्हणजे भारत, चीन आणि रशिया एकाच मंचावर आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट उठल्याचे बघायला मिळाले. भारताला मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे टार्गेट करत आहेत.
