Donald Trump Tariffs : टॅरिफमुळे चीनचा प्रचंड संताप, अमेरिकेला मोठा इशारा, टॅरिफ लावला तर…वाद पेटणार?
एकूण 14 देशांवर हा टॅरिफ लादला जाऊ शकतो. भारताचाही यात सामावेश असल्याने भविष्यात त्याचा फटका भारताला बसू शकतो. चीनने मात्र या निर्णयाला कठोर विरोध करणे सुरू केल्याने भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह एकूण 14 देशांवर पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा प्रस्तावही समोर आलाय. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली तर त्याचा सर्वाधिक फटका हा चीनला बसणार आहे. भारताचेही भविष्यात नुकसान होऊ शकते. दरम्यान, आता अमेरिकेच्या या धोरणाविरोधात चीनने आक्रमक पवित्रा धारण केलाय. अमेरिकेने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा अन्यथा आम्ही आवश्यक ते पाऊल उचलण्याचा आमचा अधिकार सुरक्षित ठेवलेला असून योग्य तो निर्णय घेऊ, असा इशारा चीनने अमेरिकेला दिलाय.
चीनची भूमिका काय?
अमेरिकेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी चीनने केलीय. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते हे यादोंग यांनी या भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिलीय. टॅरिफचा निर्णय घेण्यासाठी अमेरिकेने जी चौकशी केलीय ती एकतर्फी आहे. चीन या निर्णयाचा कठोर विरोध करतोय. अमेरिकेने या चुकीच्या प्रथांमध्ये सुधारणा करायला हवी. चर्चा, संवादाच्या मदतीने आपापसातील मतभेद मिटवले जाऊ शकतात, असं मत यादोंग यांनी व्यक्त केलंय.
अमेरिकेने नेमका काय निर्णय घेतलाय?
अमेरिकेने चीन, युरोपीय संघ, जपान तसेच अन्य काही देशावर 20 टक्के टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या यादीत चीन देशाचाही समावेश आहे. या निर्णयाला मात्र चीनचा कठोर विरोध आहे. त्यामुळेच आता अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा व्यापारविषयक तणाव वाढू शकतो. सध्याच्या धोरणामुळे अमेरिकेतील स्थानिक उद्योगांना फटका बसत आहे, असा दावा अमेरिकेकडून केला जातोय.
चीन नेमका काय निर्णय घेणार?
दरम्यान, एकूण 14 देशांवर हा टॅरिफ लादला जाऊ शकतो. भारताचाही यात सामावेश असल्याने भविष्यात त्याचा फटका भारताला बसू शकतो. चीनने मात्र या निर्णयाला कठोर विरोध करणे सुरू केल्याने भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अमेरिकेने टॅरिफ लादल्यास चीन नेमका काय निर्णय घेणार, टॅरिफ वाद चिघळत जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.