AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China Protest: चीनमध्ये कोरा कागद दाखवून लोकं कशाचा विरोध करत आहेत? चिनी सरकारलाही फुटला घाम! 

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चीनच्या अनेक शहरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. स्थानिकांचे आंदोलन जगाचे लक्ष वेधून घेत आहे.

China Protest: चीनमध्ये कोरा कागद दाखवून लोकं कशाचा विरोध करत आहेत? चिनी सरकारलाही फुटला घाम! 
चीन Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 29, 2022 | 4:54 PM
Share

बीजिंग,  चीनमध्ये (Protest In China) देशांतर्गत हलह वाढत चालला आहे.  देशात कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे लॉकडाऊन लावला आहे. रविवारी चीनमध्ये कोविडची सुमारे 40 हजार नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. या लोकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित झाले असून सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिकांनी प्रदर्शने सुरु केली आहेत.  चीन सरकारच्या शून्य कोविड धोरणामुळे, अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला. लॉकडाउनच्या विरोधात लोकं रस्त्यावर उतरले आहेत आणि कठोर निर्बंधांचा निषेध करत आहेत. आंदोलक राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात घोषणा देत होते. त्यांनी “चिनफिग डेथ्रोन”, “कम्युनिस्ट पार्टी डिथ्रोन” आणि “अनलॉक चायना” अशा घोषणा दिल्या.

सरकारविरोधात पहिल्यांदाच मोठे आंदोलन

कोविड निर्बंधांविरुद्धचा हा निषेध बीजिंग आणि नानजिंगमधील विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये पोहोचला आहे. शांघायमधील निषेधाचा व्हिडीओ इंटरनेट पाहायला मिळत आहे. सरकारच्या कडक धोरणाविरोधात लोकं उघडपणे शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आंदोलक हातात कोरा कागद दाखवून सरकारचा निषेध करीत आहेत. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा जगभरात होत आहे.

हा सलग चौथा दिवस आहे जेव्हा कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी रात्री हजारो आंदोलक शांघायमधील वुलुमुकी रोडवर जमले होते, परंतु रविवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही निदर्शने सुरूच होती. याठिकाणी शेकडो लोक आणि पोलिसांमध्ये चकमकही झाली.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये, शांघायमधील आंदोलकांना अटक करताना आणि संतप्त लोक त्यांच्या अटकेचा निषेध करताना दिसत आहेत. बीजिंग, वुहान आणि चेंगडू शहरातही निदर्शने झाली.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल