
चीनची राजधानी बीजिंगची आज जगभरात चर्चा आहे. याला कारण आहे, दुसऱ्या विश्व युद्धात जपानच्या पराभवाची 80 वर्ष. थियानमेन चौकात जल्लोषात विक्ट्री डे परेड आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांची तिकडी दिसली. जवळपास 25 देशांचे नेते मंचावर उपस्थित होते.
यावेळी परेडमध्ये चीनने पहिल्यांदा आपल्या अणवस्त्रांची ताकद दाखवली. बीबीसीच्या एक रिपोर्टनुसार या परेडमध्ये हायपरसोनिक ग्लाइड व्हीकल्स, वाईजे-21 अँटी-शिप क्रूज मिसाइल, JL-3 सबमरीन लॉन्च बॅलेस्टिक मिसाइल सारखी घातक शस्त्र होती. पण सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ते DF-5C इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइलने.
अमेरिकेवरही हल्ला शक्य
DF-5C मिसाइलचा लवकरच चिनी सैन्यात समावेश होईल. पहिल्यांदा सार्वजनिकरित्या ही मिसाइल दाखवण्यात आली. हे चीनच्या जुन्या DF-5 सीरीजच एडवांस वर्जन आहे. पण नवीन मिसाइल खूप खतरनाक आहे. सर्वात महत्त्वाच वैशिष्टय म्हणजे DF-5C मिसाइलची मारक क्षमता 20,000 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजे पृथ्वीवर असा कुठला भाग नाही की, जिथपर्यंत हे मिसाइल पोहोचू शकणार नाही.
एकाचवेळी किती टार्गेट्सवर हल्ला शक्य
या मिसाइलमध्ये एकाचवेळी 10 वारहेड्स वाहून नेण्याची क्षमता आहे. म्हणजे एक चिनी मिसाइल एकाचवेळी 10 टार्गेट्सवर हल्ला करु शकतं. Global Times च्या एका रिपोर्ट्नुसार DF-5C चा स्पीड कमालीचा आहे. ध्वनीपेक्षा अनेक पट वेगाने हे मिसाइल उड्डण करतं. प्रचंड वेगामुळे शत्रुला या मिसाइलला रोखण्याची फार संधी मिळत नाही. यातील वॉरहेड्स न्यूक्लियर सुद्धा असू शकतात. चीनने या मिसाइलमध्ये Beidou Navigation System बसवली आहे. त्यामुळे हे मिसाइल अचूकतेने हल्ला करते.
ते अमेरिकेला पर्याय ठरु शकतात
रेंज, स्पीड आणि मल्टीपल वॉरहेड्समुळे DF-5C हे मिसाइल शत्रुसाठी एक वाईट स्वप्न ठरतं. बीजिंगने या मिसाइलचा विक्ट्री डे परेडमध्ये समावेश करुन जगाला दाखवून दिलय की, ते आता जगापासून आपली अणवस्त्र क्षमता लपवणार नाहीत. बीजिंगने या शो च्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की, ते अमेरिकेला पर्याय ठरु शकतात.