भारताविरोधात नडणाऱ्याचा गेम, चीनचा जनरल थेट… शी जिनपिंग यांच्या आदेशाने मोठी उलथापालथ
भारत आणि चीनचे संबंध गेल्या काही वर्षांचा विचार केला असता सुधारताना दिसत आहेत. त्यातच आता चीनच्या राष्ट्रध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला. नेपाळमधील पुराच्य पार्श्वभूमीवर चीनवर गंभीर आरोप केली जात आहेत.

भारत आणि चीनमध्ये कायमच स्पर्धा राहिली आहे. 2020 मध्ये सीमेवर मोठा तणाव बघायला मिळाला. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांचे संबंध अधिक चांगले होताना दिसले. अमेरिकेचा पुढे येऊन विरोध करताना चीन दिसला. यादरम्यानच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचा दाैरा केला. भारत आणि चीनमध्ये महत्वाचे करार देखील झाले. त्यातच आता चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. थेट आदेश काढले. ज्यानंतर आता भारत आणि चीनचे संबंध अधिक चांगलेच होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये मोठा पूर आला. या पुराला चीनच दोषी असल्याचे सांगितले जाते. चीन नेपाळला वाचू शकला असता असा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यातच आता मोठी बातमी चीनमधून पुढे येताना दिसतंय.
शी जिनपिंग यांच्या सरकारने जनरल झाओ झोंगकी यांना त्यांच्या वरिष्ठ राजकीय सल्लागारपदावरून हटवले आहे. डोकलाममधील तणाव आणि 2020 मध्ये भारतासोबत झालेली गलवान खोऱ्यातील चकमक या घटनांमुळे झाओ झोंगकी चर्चेत होते. भारताविरोधात त्यांनीच आदेश दिले होते. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे नेतृत्व करताना झाओ यांनी भारताबद्दल धक्कादायक निर्णय घेतला. आता त्यांना दणका देण्यात आला.
मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील तणावाच्या काळात तेच जबाबदार होते. गलवानमधील प्राणघातक संघर्षाचे आदेश त्यांनी दिली होती. अमेरिकेच्या 2020 मधील गुप्तचर अहवालाचा संदर्भ देत एएनआयने वृत्त दिले आहे की, भारताला धडा शिकवण्यासाठी झाओ यांनी गलवानमधील कारवाईला मंजुरी दिली होती. ज्यानंतर दोन्ही सैन्यामध्ये मोठी झडप झाली. या झडपमध्ये भारतीय सैन्याच्या तब्बल 20 जवान शहीद झाले होते.
15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये दगड, देशी शस्त्रे, लोखंडी सळया घेऊन संघर्ष झाला होता. झाओ यांची चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्समधील सदस्यत्व रद्द करण्यात आली. शी यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेदरम्यान शिस्त आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी चीनने झांग युक्सिया आणि लिऊ झेनली या दोन वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना सेंट्रल मिलिटरी कमिशनमधून हटवले.