धक्कादायक… आणखी एक विमान अपघात, लॅंडिंगपूर्वीच क्रॅश, खासदारासह 15 ठार, अख्खा देश सुन्न

कोलंबियामध्ये एक भीषण विमान अपघात झाला असून त्यामध्ये कोलंबियातील खासदारासह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सतेना एअरलाइन्सचे ट्विन-प्रोपेलर विमान कुकुटाहून व्हेनेझुएलाच्या सीमेजवळील डोंगराळ प्रदेशातील ओकाना येथे उड्डाण करत होतें. मात्र लँडिंगच्या काही काळापूर्वीच त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला.

धक्कादायक… आणखी एक विमान अपघात, लॅंडिंगपूर्वीच क्रॅश, खासदारासह 15 ठार, अख्खा देश सुन्न
कोलंबियात मोठा विमान अपघात
| Updated on: Jan 29, 2026 | 8:58 AM

कोलंबियामध्ये एक मोठा, भीषण विमान अपघात झाला आहे. कोलंबियन खासदारासह 15 जणांना घेऊन जाणारे एक ट्विन-प्रोपेलर विमान बुधवारी व्हेनेझुएलाच्या सीमेजवळील डोंगराळ भागात कोसळले, अशी माहिती राजधानी बोगोटा येथील अधिकाऱ्यांनी दिली. या भीषण प्लेन क्रॅशमध्ये विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलंबियाच्या सरकारी मालकीच्या एअरलाइन सॅटेनाद्वारे हे विमान चालवलं जात होतं.
यामुळे मोठी खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितानुसार, कोलंबियाच्या सीमावर्ती शहर कुकुटा येथून या विमानाने उड्डाण केले आणि दुपारी (1700GMT) ओकाना येथे उतरण्यापूर्वीच त्या विमानाच हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. अपघातग्रस्त विमानामध्ये 13 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. या विमानाचा प्रवास केवळ 23 मिनिटांचा होता, मात्र ते अखेरचे उड्डाण ठरलं आणि सर्वांनीच जीव गमावला. कोलंबियाच्या सरकारी मालकीच्या एअरलाइन सॅटेनाचं हे विमान होतं अशी माहिती समोर आली आहे.

कोणीच वाचलं नाही – एव्हिएशन अधिकाऱ्यांची माहिती

“या अपघातात विमानातलं कोणीही वाचलं नाही,” असे विमान वाहतूक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले. मात्र विमानाचा हा अपघात नेमका कसा, का झाला याचे कारण त्वरित कळू शकलं नाही. सरकारने या भागात शोध घेण्यासाठी हवाई दल पाठवले आहे. विमान अपघाताचे ठिकाण अँडीज पर्वतरांगांच्या पूर्वेकडील भागात एक खडकाळ, घनदाट जंगली क्षेत्र असून तिथलं हवामान वेगाने बदलत असतं. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील मोठा भाग कोलंबियाच्या सर्वात मोठ्या गनिमी गटाच्या, नॅशनल लिबरेशन आर्मीच्या नियंत्रणाखाली आहे, ज्याला त्याचे स्पॅनिश नाव, ELN या नावाने ओळखले जाते.

मृतांमध्ये खासदाराचाही समावेश

आतापर्यंत सात मृतदेह सापडले आहेत. विमानात कोलंबियन खासदार आणि एक विधानसभेचा उमेदवार होताल असं उत्तर सँटँडर राज्याचे गव्हर्नर विल्यम विलामिझर यांनी स्थानिक वृत्तपत्र सेमानाशी बोलताना सांगितलं. ” अपघातातीलया मृत्यूंमुळे मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना.” अशा शब्दांत राष्ट्रपति गुस्तावो पेट्रो यांनी शोक व्यक्त केला. विमान अपघातातील मृतांमध्ये कोलंबियाच्या चेंबर ऑफ डेप्युटीजचे सदस्य ३६ वर्षीय प्रतिनिधी डायोजेनेस क्विंटेरो आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचा समावेश असल्याचं समजतं.